कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणूकांमुळे राजकारणाला उत आला आहे. मतदारांना आपल्या पक्षाकडे ओढण्यासाठी पक्ष सर्व शक्य ते प्रयत्न करीत आहेत. भाजपसाठी बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवती जीव तोडून मेहनत घेत आहेत. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून तृणमूल कॉंग्रेसने समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांना मैदानात उतरवले आहे. परंतु प्रचारादरम्यान या स्टार प्रचारकांचा संतापदेखील पाहायला मिळत आहे. जया बच्चन यांनी सेल्फी घेणाऱ्या कार्यकर्त्याला जोरदार धक्का मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थनात जय बच्चन अनेक दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जींसाठी प्रचार करीत आहे. तिथे त्या अनेक उमेदवारांच्या समर्थनात रोड शो देखील करीत आहेत.
चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी रोडशो करताना जया बच्चन एका कार्यकर्त्यांवर भडकल्या आणि संतापात त्यांनी त्याला जोरदार धक्का दिला.
या वेळचा त्यांचा व्हिडिओ सोशलमीडियावर तुफान व्हायरल झाला.
सोशल मीडियावर जया बच्चन यांच्यावर टीकेचा भडीमार होत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकणावरून टीएमसीकडून कोणतही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
परंतु सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे टीएमसीच्या अडचणीत वाढ होण्चाची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
Rudeness is also known as #JayaBachchan pic.twitter.com/4bAxF1Gt72
— Jagat Darak (@jagat_darak) April 8, 2021