नवी दिल्ली : मॉस्को (Moscow)मध्ये भारत (India) आणि चीन (China)च्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये जवळपास अडीच तासाची चर्चा झाल्यानंतरही दोन्ही देशात तणावाच वातावरण आहे. दोन्ही देशातील सैनिक लडाखमध्ये शस्त्र आणि दारूगोळा घेऊन ३०० मीटर दूर आमने-सामने उभे आहे. याच दरम्यान जपान आणि ताइवान या दोन देशांनी चीनला आपल्या देशातील सीमेचं उल्लंघन केल्याप्रकरणी चेतावणी जाहीर केली आहे.
ताइवानचे उपराष्ट्रपती Lai Ching-te यांनी सांगितलं की, चीनने लाइनला क्रॉस करू नये आणि आपल्या फायटर विमानांना ताइवानची हवाई सीमेचं उल्लंघन करण्यापासून रोखण्याची चेतावणी दिली आहे. चेतावणी दिली आहे की, ताइवान आपल्या हवाई सीमेच्या रक्षणाकरता एअर डिफेंस आयडेंटिफिकेशन झोन बनवत आहे. याकरता चीनने आता कोणतीच चूक करू नये. उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केलं आहे की, ताइवानला शांती आहे. मात्र आपल्या लोकांच्या संरक्षणाकरता त्यांना लढणं माहित आहे.
जपानचे संरक्षणमंत्री तारो कोनोने चीनला आपल्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून खूप मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. कोनो यांनी म्हटलं की, चीन आपल्या सेनेच्या जोरार पूर्वी चीन सागरात आपलं प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.