'काहीच माहिती नव्हतं, पंतप्रधान मोदींनी 2 तासाआधी फोन करुन सांगितलं'

पंतप्रधान मोदींचा जेव्हा अचानक फोन येतो आणि...

Updated: Aug 30, 2018, 12:34 PM IST
'काहीच माहिती नव्हतं, पंतप्रधान मोदींनी 2 तासाआधी फोन करुन सांगितलं' title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं की, 21 ऑगस्टला त्यांच्या नव्या नियुक्तीबद्दल त्यांना 2 तास आधी माहिती झालं. मंगळवारी इंडियन एक्स्प्रेसने घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला फोन केला आणि म्हटलं की, तुम्ही जम्मू-काश्मीरला जा आणि तेथे काम करा'. तुम्हाला चांगले सल्लागार आणि प्रशासक मिळतील. त्यामुळे मी पुढे आलो. त्याच संध्याकाळी माझा नावाची घोषणा केली गेली. कारण एनएन वोहरा दिल्लीला आले होते आणि एकही दिवस रिकामा सोडला जाऊ शकत नव्हता.'

दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चेनंतर त्यांनी लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये काही तरी मोठी घोषणा होईल असे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटलं की, मी अशी सिस्टम आणू इच्छित आहे ज्यामुळे ना जातीवाद, ना पक्षपात आणि ना शिफारश चालेल. मी लोकांमध्ये विश्वास आणू इच्छितो. लोकांना असं वाटलं पाहिजे की, जम्मू-काश्मीर सरकार त्यांच्या दारापर्यंत आली पाहिजे. सरकार नेहमी त्यांच्या सोबत आहे.'

त्यांनी पुढे म्हटलं की, गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटण्यापूर्वी त्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांच्या काही मागण्यांबद्दल सांगण्यात आलं. ज्यामध्ये पोलिसांच्या घरासाठी फंडची मागणी होती. त्याला मंजुरी देण्यात आली. पोलीस शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वाढवण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक गोष्टींच्या घोषणा केल्या जाणार आहे. येथे काम करणं आव्हानात्मक आहे. पण जर माझ्य़ामुळे जर येथे थोडाही बदल झाला तर मला वाटेल की मी आयुष्यात काही तरी केलं.'