श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. कोरोनाचा कोणताही धोका लहान मुलांना पोहोचू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. जम्मू, सांबामधील सर्व प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जम्मूमधील सर्व प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.
जम्मू: जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी कोरोनव्हायरसचा पहिल्या रुग्णाची नोंद केली गेली आहे, अशी माहिती एएनआयच्या अहवालात देण्यात आली आहे. नव्या पुष्टी झालेल्या घटनेमुळे देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३२वर पोहोचली आहे. जम्मूमधील सरकारी वैद्यकीय रुग्णालायत या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
#BreakingNews । जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना व्हायरस रुग्णाची पहिली नोंद झाली आहे. खबरदारी म्हणून जम्मू, सांबामधील सर्व प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत.#coronavirusindia #Coronavirushttps://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/aB7VMQBPTS
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 7, 2020
काश्मीरमधील कोरोनोचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्यातील आरोग्य विभागाला सतर्क केले आहे. प्रशिक्षित कर्मचारी एकत्रित केले गेले आहेत आणि एक वेगळ्या वॉर्डची स्थापना केली गेली आहे. काश्मीरमधील वैद्यकीय केंद्रांवर डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर सरकारनेही श्रीनगर विमानतळावर परदेशी तपासणीसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
तसेच कोरोनाचा कोणताही धोका नको म्हणून जम्मू-काश्मीरमधील सर्व बायोमेट्रिक हजेरी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसे सर्व प्रशासनाला आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, राज्य अधिकाऱ्यांनी जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा तत्काळ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
जम्मू आणि जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा त्वरित प्रभावाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. जम्मू-काश्मीरमधील सर्व बायोमेट्रिक हजेरीही ३१ मार्चपर्यंत बंद राहिल, असे ट्विट जम्मू-काश्मीरचे सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल आणि प्रधान सचिव यांनी केले आहे.
कोरोनाव्हायरस कंट्रोलचे नोडल अधिकारी डॉ. शफ़कत खान यांनी सांगितले की, जम्मू-कश्मीरमध्ये आतापर्यंत ७००० लोकांची तपासली गेली आहेत, ३०० लोक निरीक्षणाखाली आहेत. तसेच २७ जणांचे नमुने दिल्लीत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.