मोठी बातमी| पाकिस्तानच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई

आताची सर्वात मोठी बातमी| सुरक्षा दलाकडून बारामुल्ला परिसरात मोठी कारवाई

Updated: May 25, 2022, 12:16 PM IST
मोठी बातमी| पाकिस्तानच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई title=
फोटो सौजन्य- ANI

श्रीनगर : आताची सर्वात मोठी बातमी जम्मू-काश्मीरमधून आहे. बारामुल्ला परिसरात सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. बारामुल्ला परिसरातील करेरी या भागात सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

मिळालेल्या माहितीनुसार तीनही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये या भागात चकमक सुरू झाली. 

या चकमकीत पाकिस्तानचे 3 दहशतवादी ठार झाले. तर सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीरमरण आलं. याची माहिती आईजीपी विजय कुमार यांनी दिली आहे. 

मागच्या काही महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमधील अनेक भागांमध्ये दहशतवांद्यांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.