काळानं घात केला...बसचा भीषण अपघात 6 जणांनी गमावला जीव तर...

या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 45 जण जखमी आहेत. 

Updated: May 25, 2022, 10:25 AM IST
काळानं घात केला...बसचा भीषण अपघात 6 जणांनी गमावला जीव तर... title=

नवी दिल्ली : पर्यटन आणि आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर काळानं घाला घातला. काळानं घात केला आणि रस्त्यात गाठलं. पर्यटकांनी भरलेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. 

या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 45 जण जखमी आहेत. जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ही पर्यटकांनी भरलेली बस होती. या गाडीत 65 पर्यटक होते. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री 9 च्या सुमारास खासगी बस विशाखापट्टणमसाठी निघाली होती. तेव्हा कलिंगा घाटी इथे हा भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. 

ही बस पश्चिम बंगालमधून आली होती. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 लोक जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.