मोदींच्या निमंत्रणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रंम्प नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहे. इवांका येथे एका ग्लोबल एंटरप्रिन्योर समिटमध्ये सहभागी होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी देखील सहभागी होणार आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इवांका हैदराबादला पोहोचणार आहे. भारतात आठवं जीईएस संम्मेलन होत आहे. जूनमध्ये अमेरिका दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी यांनी इवांकाला भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस इवांकाने देखील ट्विट करत निमंत्रण दिल्यामुळे आभार मानले होते.

Updated: Aug 9, 2017, 04:13 PM IST
मोदींच्या निमंत्रणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रंम्प नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहे. इवांका येथे एका ग्लोबल एंटरप्रिन्योर समिटमध्ये सहभागी होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी देखील सहभागी होणार आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इवांका हैदराबादला पोहोचणार आहे. भारतात आठवं जीईएस संम्मेलन होत आहे. जूनमध्ये अमेरिका दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी यांनी इवांकाला भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस इवांकाने देखील ट्विट करत निमंत्रण दिल्यामुळे आभार मानले होते.

जीईसीची सुरुवात २०१० मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. यावर्षी जीईएसचं आठवं सम्मेलन आहे. भारतासाठी या सम्मेलनाचं आयोजन करण्याची पहिली संधी मिळाली आहे. पीएम मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर भारताला या सम्मेलनाचं आयोजन करण्याची संधी देण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार कार्यक्रम भव्य करण्याच्या मागे कूटनीती आहे. यामुळे एच-1बी वीजाच्या बाबतीत भारताला फायदा होईल. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना देखील फायदा होईल.