IT Sector ला येणार अच्छे दिन! शेअर बाजार तज्ज्ञांनं सांगितलं यामागचं कारण

जागतिक स्थितीचा शेअर बाजारावर रोजच्या रोज परिणाम होत असतो. काही सेक्टरवर चांगला, तर काही सेक्टरवर वाईट परिणाम होतो. या वर्षी आयटी सेक्टर (IT Sector) अंडरपरफॉर्म करत आहे. 

Updated: Oct 11, 2022, 12:39 PM IST
IT Sector ला येणार अच्छे दिन! शेअर बाजार तज्ज्ञांनं सांगितलं यामागचं कारण title=

Stock Market: जागतिक स्थितीचा शेअर बाजारावर रोजच्या रोज परिणाम होत असतो. काही सेक्टरवर चांगला, तर काही सेक्टरवर वाईट परिणाम होतो. या वर्षी आयटी सेक्टर (IT Sector) अंडरपरफॉर्म करत आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) यूएस फेडनं केलेल्या व्याजवाढीमुळे अमेरिका (America) आणि यूरोप (Europe) मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते असं बोललं जात आहे. असं असताना आयटी सेक्टरशी निगडीत कंपन्यांनी त्रैमासिक निकाल जाहीर केला आहे. कंपन्यांचा निकाल पाहता वैभव अग्रवाल (Vaibhav Agrawal) (रिसर्च हेड, बसंत माहेश्वरी वेल्थ अॅडव्हायजर्स एलएलपी ऑन आयटी सेक्टर) यांनी सांगितलं की, आयटी कंपन्यांचे निकाल जाहीर होत आहेत, अमेरिका आणि युरोप या दोन्ही देशांमध्ये खूप मागणी आहे.

मागणी आणि पुरवठा

वैभव अग्रवाल यांनी सांगितलं की, आयटी कंपन्यांच्या ग्राहकांद्वारे तंत्रज्ञानावरील खर्च चालूच राहणे अपेक्षित आहे आणि मंदीच्या परिस्थितीत कपात करणे ही शेवटची गोष्ट असेल. तसेच, पुरवठ्याची स्थिती सुधारली आहे. पुढे जाऊन मार्जिन स्थिर झाले पाहिजे आणि मागणीची चिंता कमी झाली पाहिजे. वैभव अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मोठ्या कंपन्या बायबॅकची घोषणा करतात, तेव्हा यामुळे या क्षेत्राचा दृष्टीकोन दिसतो. आयटी शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसते. बर्‍याच मिडकॅप आयटी कंपन्या मोठ्या वाढीची क्षमता असलेल्या विशिष्ट विभागांवर लक्ष ठेवून आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत आयटी क्षेत्रात पुन्हा वाढ दिसू शकते.

टीसीएसला झाला नफा

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 10,465 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे. एका वर्षापूर्वी हा नफा रु. 9,653 कोटी होता. यासह, कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 8.41 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. सध्या टीसीएसच्या शेअरची किंमत 11 ऑक्टोबर 2022 रोजी 3085 रुपयांच्या आसपास आहे. त्याची 52 आठवड्यांची उच्च किंमत 4043 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची सर्वात कमी किंमत 2926.10 रुपये आहे.

Indian Railways : रेल्वे तिकीट कन्फर्म झालं नाही तरी मिळणार पूर्ण सीट, जाणून घ्या नियम

शेअर बायबॅक

आयटी कंपनी इन्फोसिस 13 ऑक्टोबरला शेअर बायबॅकच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. कंपनीने 10 ऑक्टोबरला स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये याबाबत माहिती दिली आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी, इन्फोसिस शेअरची किंमत रु. 1450 च्या जवळ आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1953.90 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 1355 रुपये आहे.

या शेअर्समध्ये घसरण

11 ऑक्टोबर 2022 रोजी एनएसईवर टेक महिंद्राच्या शेअरची किंमत 1017 रुपयांच्या जवळ आहे. त्याची 52 आठवड्यांची कमी किंमत 1838 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची कमी किंमत 943.70 रुपये आहे. त्याच वेळी, विप्रोच्या शेअरची किंमत 413 रुपयांच्या जवळ आहे. त्याची 52 आठवड्यांची उच्च किंमत 739.85 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची सर्वात कमी किंमत 384.60 रुपये आहे.