Travel On Diwali: अवघ्या काही दिवसांवर वर्षभरातं सर्वात उत्साही पर्व येणार आहे. हे पर्व आहे प्रकाशाचं, आनंदाचं आणि सकारात्मकतेचं. हे पर्व आहे दिवाळी सणाचं. भारतासह जगभरात विविध ठिकाणी दिवाळी साजरा करण्यात येते. विविधतेनं नटलेल्या आपल्या देशात या सणाचा उत्साह आणि रंगत मात्र काही औरच. बरं, इथं विविधता ही संस्कृतींपुरताच मर्यादित न राहता सण साजरा करण्यामध्येही देशात तितकच वैविध्य दिसतं. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवाळी बहुविध पद्धतींनी साजरा करण्यात येते. यामध्ये एकच दुवा सर्वठिकाणी सातत्यानं पाहायला मिळतो तो म्हणजे आनंदाची उधळण करण्याच्या वृत्तीचा.
दिवाळीच्या दिवसांमध्ये असणारी सुट्टी (Diwali Holidays) आणि त्या धर्तीवर कुठेतरी फिरायला जाणारी मंडळीही कमी नाहीत. एखाद्या नव्या ठिकाणी भेट देत तिथं दिवाळी साजरा करणाऱ्या वर्गात गेल्या काही वर्षांमध्ये भर पडत आहे. तुम्हीही त्यापैकीच आहात का?
दिवाळीला सुट्टी मिळालीये, बजेटही बऱ्यापैकी जमतंय फक्त फिरायला जायचं कुठे हेच कळत नाहीये. कारण, फिरण्यासोबतच दिवाळीच्या माहोलाचाही आनंद घ्यायचाय अशाच पेचात तुम्ही अडकला असाल तर, काही Best पर्याय आम्ही आज तुम्हाला सुचवणार आहोत. जिथं भेट देऊन तुम्ही अनोखं Diwali Celenbration करु शकता.
अयोध्या (Ayodhya)
असं म्हणतात की, दिवाळीची सुरुवातच अयोध्येपासून झाली होती. रावणावर विजय मिळवून जेव्हा प्रभू राम अयोध्येत परतले होते तो दिवाळीचाच दिवस होता. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्यानगरीत दिव्यांची आरास करण्यात आली होती. आताही दिवाळीच्या निमित्तानं अयोध्येला प्रतीवर्षी नवी झळाळी मिळते.
अमृतसर (Amritsar)
दिवाळीच्या दिवसांमध्ये अमृतसर आणि नजीकचा परिसरही पाहण्याजोगा असतो. इथं सुवर्णमंदिर, अटारी बॉर्डर या भागांमध्येही अदभूत वातावरणाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठीही हे ठिकाण एक उत्तम पर्याय ठरू शकतं.
वाराणासी (Varanasi)
सणउत्सव आणि अध्यात्माचं केंद्रस्थान म्हणून वाराणासीकडे पाहिलं जातं. विश्ननाथाची ही नजरी दिवाळीला एखाद्या नववधूप्रमाणे सजते. या दिवसांमध्ये होणारी गंगा आरती निर्विवादपणे अविस्मरणीय ठरते.
उदयपूर (Udaipur)
तलाव आणि आलिशान महालांनी सजलेलं उदयपूरही तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीत अविस्मरणीय अनुभव देईल. अनेक हॉस्टेल्सच्या उपलब्धतेमुळं आता इथंही तुम्ही स्वस्तात मस्त सुट्ट्या व्यतीत करु शकता.
मदुराई (Madurai)
दक्षिणेकडे असणाऱ्या मदुराईमध्ये दिवाळी एक दिवस आधीच साजरा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवळी इथं लहान मुलांना आल्याच्या तेलानं अंघोळ घालण्यात येते. पारंपरिक खाद्यपदार्थांच्या मेजवानी यावेळी इथं असतात.
पुद्दुचेरी (Puducherry)
दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्हाला धकाधकीच्या आयुष्यापासून दूर संथ गतीनं दिवस व्यतीत करायचे असल्यास पुद्दुचेरी उत्तम पर्याय. इथं तुमच्या खिशावरही फार ताण येणार नाही.