ISRO Chief Viral Video : चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्त्रो प्रमुखांची पार्टी, काय आहे व्हिडीओमागील सत्य

ISRO Chief Viral Video : भारतीय अंतराळ संस्था (ISRO) चा चांद्रयान 3 ने यशस्वीरित्या लँडिंग केली. भारताने चंद्रावर पोहोचून तिरंगा फडकवला. त्यानंतर इस्त्रो प्रमुखांचा पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 26, 2023, 08:57 AM IST
ISRO Chief Viral Video : चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्त्रो प्रमुखांची पार्टी, काय आहे व्हिडीओमागील सत्य title=
isro chief s somanath celebration with team after success of chandrayaan 3 dance video viral on Internet trending news today

ISRO Chief Viral Video : चंद्रावर चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंग करुन चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. इस्त्रोच्या या यशस्वी मोहीमेने भारताने इतिहास रचला आहे. या यशस्वी मोहीमेनंतर जगभरात भारताचं कौतुक होतं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीसवरुन थेट बंगळुरुमध्ये विज्ञाकांची पाठ थोपटण्यासाठी पोहोचले. या यशानंतर भारतीय अंतराळ संस्था (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ यांचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तो ट्रेंडमध्ये (top trends) आहे. हा व्हिडीओ चांद्रयान 3 च्या यशाची पार्टी असल्याचं यूजर्सचं म्हणं आहे. (isro chief s somanath celebration with team after success of chandrayaan 3 dance video viral on Internet trending news today)

इस्त्रो प्रमुखांनी घोषणा केली की, भारत आता चंद्रावर पोहोचला आहे त्यानंतर सर्व शास्त्रज्ञांनी एकच टाळ्यांच्या कडकडाटात हा ऐतिहासिक क्षण मोठ्या उत्साहात साजरा केला. एवढ्या मोठ्या यशानंतर सेलिब्रेशन तो बनता है ना. बस मग काय सोशल मीडियावर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ डीजेवर वाजत असलेल्या एका गाण्यावर थरकताना दिसतं आहेत. या व्हिडीओमध्ये इस्त्रो प्रमुखांसोबत इतर वैज्ञानिकही दिसत आहेत. चांद्रयान-3 च्या यशानंतरची ही पार्टी असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. 

दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. ऐसे में पार्टी तो बनती है ! या आशयाचा हा व्हिडीओ खरं तर जुना व्हिडीओ आहे. जो चांद्रयान 3 ची सक्सेस पार्टीचा असल्याचा एका X वरील यूजरने शेअर केला. चांद्रयान 3 च्या यशानंतर सोशल मीडियावर बुधवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांना वाटलं यशाची पार्टीचा हा व्हिडीओ आहे. Awanish Sharan या यूजर्सने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आज ट्रेंडिंगमध्ये आहे. 

हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. इस्त्रोच्या वैज्ञानिकांचंही त्यांनी तोंडभरुन कौतुक केलं. दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश तर चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश बनला आहे. भारतापूर्वी, अमेरिका, रशिया आणि चीनेही ही कामगिरी केली आहे.