Credit Card खरंच फ्री असतं का? घेतलं तर काय नुकसान होतं? जाणून घ्या यामागचं वास्तव

तुम्हाला अनेक बँका आमचं क्रेडिट कार्ड घ्या म्हणून कॉल करतात. क्रेडिट कार्ड (Credit Card) घेण्यासाठी आकर्षक ऑफर देतात. अनेक बँका क्रेडिट कार्ड फ्री असल्याचं सांगतात, त्यामुळे आपला संभ्रम वाढतो. खरंच क्रेडिट कार्ड फ्री असतं का? की छुपे शुल्क किंवा "टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड" असतात? आजीवन मोफत क्रेडिट कार्डचा अर्थ काय?

Updated: Oct 18, 2022, 08:04 PM IST
Credit Card खरंच फ्री असतं का? घेतलं तर काय नुकसान होतं? जाणून घ्या यामागचं वास्तव title=

Credit Card: तुम्हाला अनेक बँका आमचं क्रेडिट कार्ड घ्या म्हणून कॉल करतात. क्रेडिट कार्ड (Credit Card) घेण्यासाठी आकर्षक ऑफर देतात. अनेक बँका क्रेडिट कार्ड फ्री असल्याचं सांगतात, त्यामुळे आपला संभ्रम वाढतो. खरंच क्रेडिट कार्ड फ्री असतं का? की छुपे शुल्क किंवा "टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड" असतात? आजीवन मोफत क्रेडिट कार्डचा अर्थ काय? वास्तविक, बँका क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क आकारतात. एक प्रकारे हा वार्षिक देखभाल शुल्क आहे. पण काही बँका क्रेडिट कार्डांवर हे वार्षिक शुल्क आकारत नाहीत आणि ते आजीवन विनामूल्य क्रेडिट कार्डप्रमाणे ऑफर करतात. पण क्रेडिट कार्ड खरोखर विनामूल्य आहे की नाही हे समजून घ्या.

बँका काही क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क आकारात नाही. पण रेग्युलर क्रेडिट कार्डच्या तुलनेत जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळत नाहीत. पण वार्षिक शुल्क नसल्याने आपण निश्चिंत असतो. काही क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क भरायचं नसल्यास तुम्हाला ठराविक रक्कम खर्च करावी लागते. तुमच्या कार्डवर अशी काही अट आहे का हे पाहण्यासाठी क्रेडिट कार्डची फाईनप्रिंट वाचा. वार्षिक शुल्क माफ करण्यासाठी ठराविक रकमेपर्यंत खर्च करण्याची अट असेल तर हा व्यवहार तोट्याचा ठरू शकतो.

तुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट

काही बँका फक्त पहिल्या वर्षासाठी किंवा पहिल्या काही वर्षांच्या वापरासाठी शून्य वार्षिक शुल्क आकारतात. परंतु ही सूट संपल्यानंतर तुमच्याकडे फक्त दोन पर्याय शिल्लक राहतात. एकतर वार्षिक शुल्क भरा किंवा क्रेडिट कार्ड बंद करा. लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड विनामूल्य असू शकतात, परंतु केवळ एका मर्यादेपर्यंतच.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x