IPS Success Story: अनाथाश्रमात शिकून बनला IPS!अधिकाऱ्याची सक्सेस स्टोरी प्रेरणादायी

IPS officer Mohammad Ali Shihab: मोहम्मद अली शिहाब या तरूणाच्या यशाची कहानी खुपच प्रेरणादायी आहे. या तरूणाने अनेक अडचणींवर मात करत देशातली सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली.

Updated: Feb 5, 2023, 04:03 PM IST
IPS Success Story: अनाथाश्रमात शिकून बनला IPS!अधिकाऱ्याची सक्सेस स्टोरी प्रेरणादायी title=

IPS Officer Success Story: तुमच्या अंगी जर जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची क्षमता असेल, तर तुम्ही कोणतेही यश  सहज मिळवू शकता. मात्र आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) ऑफिसर बनन काही सोप्प काम नाही.त्यासाठी सुमार मेहनत करावी लागते. अशाच एका सुमार मेहनतीची आणि कष्टाची कहानी समोर आली आहे. यामध्ये एक तरूण अनाथालयात शिकून आयपीएस बनला आहे. त्याच्या या यशाच्या कहानीची सध्या सर्वदूर चर्चा आहे. 

केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातील एडवन्नापारा येथे राहणाऱ्या मोहम्मद अली शिहाब (Mohammad Ali Shihab) या तरूणाच्या यशाची कहानी खुपच प्रेरणादायी आहे. या तरूणाने अनेक अडचणींवर मात करत देशातली सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे त्याचे सुरुवातीचे शिक्षण हे अनाथालयात झाले होते. या अनाथालयातून शिकून तो पुढे जाऊन आता आयपीएस बनला आहे. 

वडिलांचं छत्र हरपलं

शिहाबच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. त्यामुळे घराची जबाबदारी आईवर खांद्यावर आली होती. पाच मुलांचे संगोपन करणे तिच्यासाठी खुपच अवघड जात होते, त्यामुळे तिने 11 वर्षांच्या शिहाब, 8 वर्षांच्या सोहुराबी आणि 5 वर्षांच्या नसीबाला कोझिकोड येथील कुट्टीकट्टूर मुस्लिम अनाथाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. साधारण एक दशक अनाथाश्रमात शिक्षण घेऊन तो घरी परतला होता. 

तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी 

मोहम्मद अली शिहाब (Mohammad Ali Shihab) UPSC परीक्षेत तीनदा बसला आणि 2011 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात भरती परीक्षेसाठी पात्र ठरला. भाषेचा अडसर असूनही, IPS मोहम्मद यांनी ऑल इंडियामधून 226 वा क्रमांक काढला. आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांसाठी 21 परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. 2004 मध्ये त्यांनी शिपाई, रेल्वे तिकीट परीक्षक आणि जेल वॉर्डन म्हणूनही काम केले. अशाप्रकारे शिहाबने 2011 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिसऱ्या प्रयत्नात तो आयपीएस अधिकारी बनला. 

दरम्यान शिहाब (Mohammad Ali Shihab)यांची सक्सेस स्टोरी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. अनेक आयपीएस आणि आयएएस बनू इच्छीणाऱ्या तरूण-तरूणींना तिच्याकडून प्रेरणा मिळणार आहे.