IPL 2020: हे 3 भारतीय खेळाडू यावेळी ऑरेंज कॅप जिंकू शकतात

यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये ऑरेंज कॅपचे दावेदार

Updated: Sep 5, 2020, 08:55 PM IST
IPL 2020: हे 3 भारतीय खेळाडू यावेळी ऑरेंज कॅप जिंकू शकतात title=

मुंबई : आयपीएलमध्ये अनेक भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतात. आयपीएलमुळे भारताला अनेक चांगले खेळाडू मिळाले आहेत. अनेक भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ऑरेंज कॅप जिंकली आहे. आगामी आयपीएलच्या 13 व्या सीजनमध्ये आता कोण ऑरेंज कॅप मिळवणार याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता असेलच. आयपीएलमध्ये असे 3 भारतीय खेळाडू आहेत जे ऑरेंज कॅप जिंकण्यात सक्षम आहेत.

१. विराट कोहली

टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने 2016 मध्ये ऑरेंज कॅप जिंकली होती. कोहलीकडे पुन्हा हा करिश्मा करण्याची क्षमता आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे आणि आयपीएलच्या शेवटच्या 10 सीजनमध्ये त्याने 300 हून अधिक धावा केल्या आहेत. मागील आयपीएल सीजनमध्ये विराटने 14 सामन्यांमध्ये 464 धावा केल्या आहेत. त्यामुळे कोहली यंदा ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार आहे.

२. रोहित शर्मा

आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा देखील ऑरेंज कॅपसाठी प्रबळ दावेदार आहे. आयपीएलचा हिटमन रोहित शर्माने लीगच्या इतिहासात 8 सीजनमध्येृ 400 हून अधिक धावा केल्या आहेत. रोहितने आयपीएल -12 दरम्यान 15 सामन्यांत 405 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने आयपीएलच्या इतिहासात कधीच ऑरेंज कॅप जिंकली नसली तरी त्याच्याकडे ही संधी आहे.

३. केएल राहुल

आयपीएल 2020 मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत यंदा किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल देखील आहे. केएल राहुलने न्यूझीलंडमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीने सर्वांना चकित केले. त्याचबरोबर, आयसीसी टी-20 क्रमवारीत राहुल अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सध्याच्या फॉर्ममधून केएल राहुल यावेळी ऑरेंज कॅप जिंकू शकतो. राहुलने 2019 मध्ये 14 सामन्यांत 593 धावा केल्या होत्या. केएल राहुलने गेल्या दोन आयपीएल मोसमात दोनदा 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.