ईशान्यतील विजयानंतर भाजप खासदारांना नवीन कार्यालयात आमंत्रण

ईशान्यमध्ये कमळ फुलल. भाजपने २५ वर्षांपासूनच्या डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंगच लावला. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवलं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 6, 2018, 04:51 PM IST
ईशान्यतील विजयानंतर भाजप खासदारांना नवीन कार्यालयात आमंत्रण title=

नवी दिल्ली : ईशान्यमध्ये कमळ फुलल. भाजपने २५ वर्षांपासूनच्या डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंगच लावला. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवलं.

दुसरीकडे नागालँड आणि मेघालयमध्ये देखील मित्रपक्षांसोबत मिळून भाजपने सत्ता मिळवली. या विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ८ मार्चला सर्व भाजप खासदारांना पक्षाच्या नवीन कार्यालयात बोलवलं आहे. पंतप्रधान मोदी देखील या यावेळी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'नव्या कार्यालयात प्रवेश करताच विजय मिळाला. तुम्ही सर्व या नव्या कार्यालयात या.'

Image result for BJP new office zee

भाजपचं हे नवीन कार्यालय २ एकर परिसरावर बनवण्यात आलं आहे. ६-ए दीनदयाल उपाध्याय मार्गावर हे नवीन ऑफिस बनवण्यात आलं आहे. हे नवीन कार्यालय हायटेक आणि आधुनिक सुविधांनी बनलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने पक्षाचं कार्यालय लुटियन झोनमधून बाहेर नेण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर पक्षाने कार्यालय लुटियन झोनमधून हटवलं आणि दीनदयाल उपाध्याय मार्गावर बनवलं.