मुंबई : तुम्ही निवडलेल्या शेअर्सवर तुमचा विश्वास असेल तर त्यातील काही शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जसे तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता. तसेच काही चांगल्या गुणवत्तेच्या शेअर्समध्येही तुम्ही पैसा लावू शकता. ज्यामध्ये व्याज चांगले मिळण्याची शक्यता असते. थोडक्यात तुम्ही दर महिन्याला शेअरची काही भाग खरेदी करू शकता. जसे तुम्ही शेअर खरेदी करता.
शेअर बाजारात असे काही शेअर आहेत. ज्यांवर SIPच्या माध्यमांतूनही गुंतवणूक केली जाऊ शकते. त्यावर चांगला परतावा देखील मिळतो.
कोल इंडिया SIP
शेअर बाजारात कोल इंडिया असा एक शेअर आहे. ज्यामध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. कंपनीच्या तर्फे गुंतवणूकदारांना डिविडंट दिला जातो. हा डिविडंट शेअर धारकांना प्रति शेअर मिळतो. मागील वर्षी या कंपनीने 12.5 रुपयांचा डिविडंट घोषित केला होता. हे डिविडंट बँकेतील व्याजदरांपैक्षा नक्कीच अधिक आहे.
रिलायन्स इंडस्ट्री SIP
रिलायन्स उद्योग समुहाचा शेअर सध्या मजबूत दिसत आहे. दरमहिन्याला रिलायन्सचा स्टॉक खरेदी करूनही तुम्ही लॉंगटर्म साठी चांगला परतावा मिळवू शकता. तुम्हाला वाटत असेल की, रिलायन्सचा स्टॉक महाग आहे. तर इतर चांगल्या कंपन्यांचे स्टॉक तुम्ही निवडू शकता. आणि दरमहा स्टॉक खरेदी करून चांगला परतावा मिळवू शकता.