पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा 5 लाखांची गुंतवणूक, व्याजापोटी 2 लाख रुपये कमवाल

Post Office Saving Schemes: अनेकांना पैसे कुठे गुंतवायचे हा मोठा प्रश्न असतो. गुंतवणूक करताना चांगला परतावा मिळेल की नाही. तसेच आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे ना? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या  या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले व्याज मिळेल. 5 लाखांची गुंतवणूक करा आणि फक्त व्याजातून 2 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतील. मात्र, ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 6, 2023, 03:54 PM IST
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा 5 लाखांची गुंतवणूक, व्याजापोटी 2 लाख रुपये कमवाल title=
Post Office Saving Schemes, Investment Tips for Senior Citizen

Post Office Investment Tips: भविष्याची चिंता नेहमी सतावत असते. आपल्या हातात पैसे नसतील तर आपले काय होईल?  जर तुम्हाला वृद्धापकाळात स्वावलंबी व्हायचे असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस बचत योजनेबाबत माहिती सांगत आहोत. या योजनेत केवळ 5 लाख रुपये गुंतवून केल्यास तुम्हाला केवळ व्याजातून 2 लाख रुपये मिळू शकतात. या योजनेबाबत जाणून घ्या.

प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यात कोणतीही अडचण भासू नये म्हणून पैशाची गुंतवणूक करत असते. वृद्धापकाळासाठी तसे नियोजन असते. जेणेकरून वृद्धापकाळात त्यांना कोणाच्याही समोर हात पसरावे लागू नयेत. वृद्धापकाळात तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, अशी तुमची इच्छा असेल, तर आज आम्ही तुम्हाला पोट ऑफिसच्या एका चांगल्या योजनेबद्दल सांगणार आहोत. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यास खात्रीशीर परतावा मिळतो आणि तो पूर्णपणे सुरक्षित असतो. या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आहे.

FD पेक्षा जास्त व्याजदर

केंद्र सरकारची ही एक महत्त्वाची बचत योजना आहे. (Senior Citizens Saving Scheme) ज्यामध्ये एकदा पैसे जमा केले की गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. अनेक प्रकारे, हा परतावा बँकांमधील एफडीपेक्षा निश्चित रकमेपेक्षा जास्त असतो. जर आपण या बचत योजनेतील व्याजदरांबद्दल बोललो तर सध्या यामध्ये 8.2 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. हे व्याजदर दरवर्षी बदलत राहतात, त्यामुळे त्यात पैसे जमा करणाऱ्यांना फायदा होतो. 

या योजनेत किती रक्कम गुंतवावी लागते?

आमची सहयोगी वेबसाइट 'झी बिझनेस'नुसार, ही योजना (SCSS) अशा लोकांसाठी आहे ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांनी VRS घेतले आहे. या योजनेत त्यांना 5 लाख रुपये एकरकमी जमा करावे लागतील. त्या बदल्यात, त्यांना दर तिसऱ्या महिन्याला 10,250 रुपये सुरक्षित परतावा मिळतो, म्हणजे एका वर्षात 41,000 रुपये. जर तुम्ही 5 वर्षांचा हिशोब केला तर तुम्ही फक्त व्याजातून 2 लाख रुपये कमवू शकता. तसेच तुमचे मुद्दल जसे आहे तसे सुरक्षित राहील. 

आयकरातून सूट मिळवा

या योजनेत (Senior Citizens Saving Scheme) भरघोस व्याजाचा लाभ आहे. यासोबतच, प्राप्तिकर कायदा कलम 80C अंतर्गत, त्यात पैसे गुंतवल्यास दरवर्षी 1.5 लाख रुपयांच्या कर सूटचा लाभ देखील उपलब्ध आहे. या योजनेचे खाते देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते. यामध्ये, दरवर्षी 8.2 टक्के दराने व्याज मिळते, जे इतर गुंतवणूक योजनांच्या तुलनेत खूपच चांगले आहे. या योजनेत पैसे जमा केल्यावर दर तीन महिन्यांनी पेमेंट केले जाते. दरवर्षी एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीमध्ये हे व्याजाचे पैसे थेट खात्यात ट्रान्सफर केले जातात. 

पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी काय करावे?

पोस्ट ऑफिसची ही योजना चांगली आहे. जर तुमचे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला या योजनेत खाते उघडायचे असेल, तर त्याला कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सरकारी-खासगी बँकेत जाऊन हे खाते उघडण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. खाते या फॉर्मसोबत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, ओळखीचा पुरावा किंवा केवायसीशी संबंधित इतर कागदपत्रे फॉर्मसोबत सादर करावी लागतील. याने तुमचे खाते उघडले जाईल. या योजनेत जे खाते उघडतात, त्यांचे स्टेटमेंट ईमेल किंवा पोस्टद्वारे पाठवले जाते. 

 

(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)