Investment Tips 2023: नव्या वर्षात तुमच्याकडे चांगल्या गुंतवणूकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही विविध पर्यायांचा वापर येत्या नव्या वर्षात (New Year Investment) करू घेऊ शकता. तेव्हा आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती आपण करू घेणे आवश्यक आहे. अनेकदा आपल्याला म्यूच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये (Share Market and Mutual Fund) गुंतवणूक करायची असते. त्यातून अनेकदा आपल्याला यामध्ये असणारी जोखीमही (Risk) सतावत असते. शेअर मार्केटमध्ये जोखीमची शक्यता जास्त असते परंतु त्यामानानं म्यूच्युअल फंडात ती जोखीम कमी असते. अनेकदा या दोन पर्यायांशिवाय आपण कुठे गुंतवणूक करू शकतो याकडे आपले लक्ष असते. त्यातून आता सगळीकडे लाट आहे ती जागतिक मंदीची (recession). तेव्हा अशावेळी आपल्याला चांगल्या गुंतवणूकीचा मार्ग स्विकारणं आवश्यकच होणार आहे तेव्हा जाणून घेऊया की आपल्या येत्या वर्षात आपण कोणत्या पर्यायांचा वापर करून घेऊ शकतो. (Investment tips 2023 this new year try to invest in gold and bond for better oppourtunity)
आपण सध्या पैसे गुंतवण्यापेक्षा सोन्यामध्येही गुंतवणूक करू शकतो. सध्या असे अनेक पर्याय आहेत ज्यावर तुम्ही गुंतवणूकीसाठी लक्ष केंद्रित करू शकता. सध्या बॉण्ड मार्केटमध्ये (Bond Market) चांगली तेजी आहे. त्यामुळे तुम्ही बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करू शकता. वर म्हटल्याप्रमाणे सोन्यातही (Gold Investment) तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकता. त्यामुळे जाणून घ्या या नव्या पर्यायांचा फायदा तुम्ही कशा प्रकारे करून घेऊ शकता.
सध्या बॅंका चांगल्या प्रकारे बॅंक लोन (bank loan) देत आहेत. सध्या व्याजदर वाढल्यानं तुम्हाला फिक्सड डिपोझिटवर चांगला व्याजदर मिळू शकतो. सध्या इक्विटी बाजारातही चांगली तेजी आहे. तुम्ही त्यातही गुंतवणूक करू शकता. त्यामुळे याची तुम्हाला माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यातून सेन्सेक्स आणि निफ्टीही उंचावत असले तरी यातही अनेक उतार आहेत. या दोघांमध्ये हवी तशी वाढ होताना दिसत नाही.
सध्या सोन्याचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे यातही तुम्ही गुंतवणूक करू शकता. सध्या मल्टिअसेट फंडमध्ये तुम्हाला चांगले पर्याय आहेत. असं म्हणतात मंदीच्या लाटते क्रिप्टो करन्सीही (cryptocurrency) आपटली आहे त्यामुळे सोन्याच्या गुंतवणूकीसाठी चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. यंदा सोन्याचा भाव हा 54,000 हजारापर्यंत पोहचला आहे. केंद्रीय बॅंकाही सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.
बाँड यिल्ड वाढून 7.25 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे आपल्याला या बॉन्ड मार्केटवर भर देणे परिहार्य आहे. तेव्हा डेट बॉन्डसह तुम्ही डायनेमिक बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हाला 10 टक्क्यांचा व्याजदर मिळू शकेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)