जम्मू-काश्मिरात प्रत्येक जिल्ह्यात इंटरनेट केंद्र सुरु

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्ह्यात इंटरनेट केंद्र सुरू करण्यात आले आहे.  

Updated: Oct 15, 2019, 09:37 AM IST
जम्मू-काश्मिरात प्रत्येक जिल्ह्यात इंटरनेट केंद्र सुरु title=

श्रीनगर : केंद्र शासनाने अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीर काश्मीर खोऱ्यात इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद केली होती. कालपासून मोबाईल सेवा सुरु करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना आणि सामान्य लोकांना मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात इंटरनेट केंद्र सुरू करण्यात आले आहे. श्रीनगरमध्ये टीआरसी आणि उपायुक्त कार्यालयातील लोकांसाठी अशी दोन केंद्रे सुरू केली गेली आहेत. दररोज शेकडो विद्यार्थी आणि व्यावसायिक केंद्रात फॉर्म भरण्यासाठी येत आहेत. त्यांना शासकीय अधिकारी मदत करत आहेत.

या केंद्रांना भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना यूपीएसई, जेईई गेट आणि एमसीआय आणि इतर परीक्षांसह स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याची चिंता होती. ही केंद्रे उघडल्यानंतर काश्मीरमधील विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. इंटरनेट केंद्राचे प्रभारी वाहिद यांनी झी मीडियाला सांगितले की, आम्ही त्यांना परीक्षा आणि नोकरीचे फॉर्म भरण्यास मदत करतो. आम्ही येथे सहा खिडक्या सुरु केल्या आहेत. तसेच चार डीसी कार्यालये स्थापन केली आहेत. या केंद्राचे सुमारे १० हजार फॉर्म भरले गेले आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मदत होत आहे.

खोऱ्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकांना त्यांचे कागदपत्रे स्कॅन करण्यास, परीक्षा आणि नोकरीसाठी ऑनलाइन पैसे भरण्यास मदत  होत आहे. केंद्रात येणारे विद्यार्थी खूश आहेत. त्यांचे आपले भविष्य घडविण्यासाठी अशा परिस्थितीत मदत मिळत असल्याबद्दल खूप आनंद व्यक्त केला आहे. सरकारने अशी आणखी केंद्रे स्थापन करावीत, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. फॉर्म भरण्यासाठी केंद्रात आलेला विद्यार्थी राशिद याने झी मीडियाला सांगितले की, आम्हाला फॉर्म भरण्यास अडचणी येत होत्या. मात्र ही केंद्र सुरु केल्यामुळे मोठी मदत झाली आहे. मी यूजीसी नेट परीक्षा भरण्यास आलो आहे. मला ही संधी मी गमवू शकत नाही.