International Men's Day : जागतिक पुरुष दिनाची सुरुवात कशी आणि कुणी केली तुम्हांला ठाऊक आहे का?

 International Men's Day: भारतामध्ये पहिल्यांदा 2007 साली पुरुषांच्या अधिकारांसाठी झटणारी संस्था 'Save Indian Family' ने पाहिलं International Men's Day सेलिब्रशन केलं होतं.  

Updated: Nov 19, 2022, 10:21 AM IST
International Men's Day : जागतिक पुरुष दिनाची सुरुवात कशी आणि कुणी केली तुम्हांला ठाऊक आहे का?   title=
International Men's Day celebrated every year

International Men's Day 2022: जागतिक महिलादिन (women day) जसा  8 मार्चला साजरा केला जातो, त्याचप्रमाणे 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन साजरा ( International Men's Day ) केला जातो. आपली संस्कृती पुरुषप्रधान असल्याने समाजात पुरुषांनी केलेल्या अनेक गोष्टी, त्याग हे त्यांचे कर्तव्यच असते असे समजून त्याला गृहीत धरले जाते. मात्र वयाच्या विविध टप्प्यावर अनेक मानसिक, शारीरिक टप्प्यातून जाणाऱ्या पुरुषाला देखील समाजात तितक्याच समानतेने वागवणं गरजेचे आहे. 

कसं सुरु झालं जागतिक पुरुष दिन?

अमेरिकेच्या मिसौर यूनिवर्सिटीचे प्रोफेसर थॉमस योस्टर (Professor Thomas Yoster of the University of Missouri) यांच्या प्रयत्नाने सुरुवातीला ' जागतिक पुरुष दिना'ची( International Men's Day ) संकल्पना पुढे आली. पूर्वी 7 फेब्रुवारी 1992 सालापासून अमेरिका, कॅनडा आणि युरोपीयन भागात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करायला सुरुवात झाली. मात्र 1995 सालापासून फेब्रुवारी ऐवजी नोव्हेंबर महिन्यात जागतिक पुरुष दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 

भारतामध्ये 2007 साली पाहिलं सेलिब्रेशन

भारतामध्ये पहिल्यांदा 2007  साली सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. पुरुषांच्या अधिकारांसाठी झटणारी संस्था 'Save Indian Family' ने पाहिलं सेलिब्रशन केलं होतं. त्यानंतर 'ऑल इंडिया मेन्स वेल्फेयर एसोसिएशन'ने (All India Men's Welfare Association) भारत सरकारकडे महिलांप्रमाणेच पुरुषांच्या विकासासाठीदेखील विशेष मंत्रालय सुरु करण्याची मागणी केली होती.

वाचा: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाला नवं वळण,  पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा  

अनेकदा स्त्रिया बोलून किंवा रडून मनातल्या भावना व्यक्त करतात परंतु पुरुषांना 'रडणं', 'हार पत्करणं' हे कमजोरी असल्याचे संस्कार दिल्याने त्यांच्यावर अनेक गोष्टींचा मानसिक दबाव असतो. यामधूनच त्याच्या आरोग्यावर अनेक माध्यमातून काळत नकळत गंभीर परिणाम होत असतात. म्हणूनच आज समाजात स्त्री -पुरुष सामानतेच्या मागणीप्रमाणेच पुरुषांची दु:ख देखील जाणून घेणं अत्यावश्यक बनतं चालले आहे.

1998 साली पहिल्यांदा साजरा झाला 

1998 साली त्रिनिदाद अँड टोबेगोमध्ये पहिल्यांदा 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायला सुरुवात झाली. डॉ. जीरोम तिलकसिंह यांनी जागतिक पुरुष दिनाची संकल्पना पुढे आणली. यानंतर जगभरात 70 हून अधिक देशांमध्ये जागतिक पुरुषदिन साजरा केला जातो. यूनेस्कोने देखील जागतिक पुरुष दिनाचं महत्त्व जाणून त्याचं कौतुक केलं आहे.