मुंबई : भारतातील बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करतात, कारण भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही ठिकाणी फिरायला जायचं असेल तर रेल्वे अगदी तुमच्या खिशाला परवडणारी असते. तसाच रेल्वेमुळे सुखाचा प्रवास देखील करता येतो. रेल्वेने प्रवास करण्याचा आणखी एक चांगला मुद्दा असा की, यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ओळख होतो.
तुम्ही देखील आयुष्यातून एकदा तरी ट्रेनने लांबचा प्रवास केलाच असेल. तेव्हा तुम्ही कधी खिडकितून स्टेशनचं नाव आणि इतर गोष्टी पाहिल्या आहेत? अनेकदा आपल्याला विचित्र स्टेशनची नावं वाचायला मिळतात. शिवाय अशा अनेक गोष्टी देखील दिसतात ज्याचा संदर्भ आपण लावू शकत नाही.
त्यांपैकी एक आहे स्टेशनची समुद्र सपाटीपासूनची उंची.
जेव्हाही आपण फिरायला किंवा लांबच्या प्रवासाला जातो तेव्हा सर्वप्रथम आपण रेल्वे स्थानकावर पोहोचतो, परंतु रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले चिन्ह किंवा काही लिहिलेलं तुम्ही पाहिले असेलच. स्थानकावर असलेल्या मोठ्या पिवळ्या फलकावर ठिकाणाचे नाव लिहिलेले आहे, परंतु केवळ स्थानकाचे नावच नाही, तेथे त्या स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची जसे की, 400 मीटर, 310 मीटर, 150 मीटर असं देखील लिहिलेलं असतं. जे तुम्ही पाहिलंच असेल.
परंतु हे का लिहिलं जातं? किंवा ट्रेनच्या ड्रायव्हरला किंवा प्रवाशांना या गोष्टीमुळे काय सांगायचं असेल? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हे प्रवाशांच्या माहितीसाठी लिहिले असते की त्यामागे आणखी काही कारणं आहेत?
पाहिलं तर सामान्य प्रवाशाला याच्याशी काही देणंघेणं नसतं, पण कोणत्याही ट्रेन ड्रायव्हर आणि गार्डसाठी ही खूण खूप महत्त्वाची असते. कारण हे त्या स्थानकावरून जाणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. रेल्वेच्या वैमानिकांना त्यांचे काम चांगले माहीत असले तरी काही प्रोटोकॉल असे असतात की ते अगदी सुरुवातीपासूनच पाळले जातात.
रेल्वे स्थानकाच्या नावाच्या फलकाच्या खालच्या भागात त्या स्थानकापासून समुद्रसपाटीच्या उंचीचाही उल्लेख आहे; उदा. MSL 214-42 Mts. वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर ही संख्या वेगळी आहे. पण मग या MSL चा अर्थ काय?
तर MSLचा अर्थ काय आहे मीन सी लेव्हल. आता ते लिहिणे का आवश्यक आहे? हे जाणून घेऊ.
वास्तविक, कोणत्याही रेल्वे स्थानकावरील समुद्रसपाटीपासूनची उंची रेल्वेच्या चालक आणि गार्डला मदत करण्यासाठी नमूद केली जाते. जेणेकरून ट्रेनच्या ड्रायव्हरला हे कळेल की आपण ट्रेनसोबत उंचीच्या दिशेने जात आहोत किंवा खाली उतरत आहोत, त्यानुसार त्यांना ट्रेनचा वेग राखण्यात मदत मिळते.
त्याचबरोबर गाडीच्या इंजिनला किती पॉवर सप्लाय द्यावा लागतो. जेणेकरून तो सहज उंचीच्या दिशेने जाऊ शकेल.