खरंच अक्कल दाढ आल्याने व्यक्तीला अक्कल येते? काय आहे यामागील सायन्स?

असे का होते आणि ही कल्पना कशी निर्माण झाली? याचे कारण जाणून घ्या कारण.

Updated: Feb 8, 2022, 05:05 PM IST
खरंच अक्कल दाढ आल्याने व्यक्तीला अक्कल येते? काय आहे यामागील सायन्स? title=

मुंबई : लहान बाळाचा जन्म झाल्यावर त्याला दात नसतात. काही कालांतराने लहान बाळांना दात येऊ लागतात. हे आलेले दात देखील मुलांचे पडतात आणि त्याजागी दुसरे आणि कायमस्वरुपी दात येतात. परंतु तुम्हाला तर हे माहित असेल की, लोकांना अक्कल दाढ मात्र त्यावेळेस येत नाही. ही दात व्यक्ती पौढ झाल्यानंतर येते. या अक्कल दाढेबद्दल असा समज आहे की, जेव्हा ती येते तेव्हा त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि विचार करण्याची क्षमता वाढते. असे मानले जाते लोकांना अक्कल दाढ आली हे हे लोकं हुशार आणि अधिक बुद्धिमान होतात. यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे.

संशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत ज्यावरून असे दिसून येते की, अक्कल दाढ आल्यामुळे माणूस फार हुशार होत नाही. असे का होते आणि ही कल्पना कशी निर्माण झाली याचे कारण जाणून घ्या.

प्रौढ व्यक्तीला एकूण 32 दात असतात. यापैकी वरील दोन आणि खाली दोन असे एकूण 4 अक्कल दाढा असतात. ही दाढ तुमच्या तोंडात दातांच्या ओळीत सगळ्यात शेवटी येतात. याचा मानवी बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत, कारण ते 17 ते 21 वर्षांच्या दरम्यान येतात. परंतु संशोधनाने हे सिद्ध केलं आहे की, त्यांचा बुद्धिमत्तेशी कोणताही संबंध नाही.

ही दाढ खुप उशीरा म्हणजे पौढ वयात येते. तो पर्यंत व्यक्ती कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो आणि त्यावेळी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच त्या वयात व्यक्ती अधिक हुशार होतो. त्याच वयात आपल्याला या 4 दाढा येतात. म्हणून कदाचित त्याचा संबंधी अक्कल दाढेशी लावला गेला असावा.

परंतु तुम्हाला हे माहिती असेल की, ही अक्कल दाढ येताना आपल्याला त्याचा प्रचंड त्रास होतो. या अक्कल दाढींमुळे अनेक समस्या उद्भवतात. यामध्ये पोकळीची समस्या, इन्फेक्शन, दातांच्या सभोवतालचे नुकसान आणि हाडांमुळे आजूबाजूचा भाग खराब होणे यासारख्या समस्यांचा समावेश आहे.

अक्कल दाढ काढल्यानंतर पहिल्या दिवशी रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा काही काळ सूज देखील जाणवू शकते असे डॉक्टर सांगतात. अशा परिस्थितीत काही काळ ब्रश न वापरण्याचा सल्ला देखील दिला जातो.