आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट मग तिने व्हिडीओ कॉलवर काढले कपडे; IT इंजिनीअरचे 'असे' झाले सेक्स्टॉर्शन

IT Engineer Sextortion: फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट येणे, त्यातून व्हॉट्सअॅपचा नंबर मागणे आणि व्हिडीओ कॉलवर कपडे काढून मग ब्लॅकमेल करणे हे प्रकार सर्रास होताना दिसतात. याबद्दल वारंवार जनजागृती करुनही अनेक तरुण या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. इंदूरमधील आयटी इंजिनीअर तरुणालादेखील याचा फटका बसला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 8, 2023, 12:19 PM IST
आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट मग तिने व्हिडीओ कॉलवर काढले कपडे; IT इंजिनीअरचे 'असे' झाले सेक्स्टॉर्शन title=

IT Engineer Sextortion: इंदूरच्या आयटी इंजिनीअरला एक फेसबुकवर अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं चांगलच भारी पडलं. यामध्ये त्याला पैसे तर गमवावे लागलेच पण त्याची मोठी बदनामीदेखील झाली. हा प्रकार काही एका दिवसा घडला नाही. देशातील लाखो तरुण या घोटाळ्याला बळी पडत आहेत. त्यामुळे हा प्रकार नेमका कसा घडला? याबद्दल जाणून घेऊया. 

सुमन अग्रवाल असे या इंजिनीअरचे नाव असून त्याला फेसबुकवर अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने त्याच्याकडून मोबाइल नंबर मागून घेतला. यानंतर दोघांमध्ये रात्री चॅटींग सुरु झाली. चॅटिंगच्या दरम्यान मुलीने रात्री व्हिडीओ कॉल केला आणि बाथरूममध्ये तिचे संपूर्ण कपडे काढले. यानंतर तिने इंजिनियरला तरुणाला देखील कपडे काढून चेहरा दाखवण्यास सांगितले. इंजिनीअर तरुणाने तोंड दाखविले नाही. यानंतर अवघ्या 5 सेकंदात तिने कॉल डिस्कनेक्ट केला. 

तलावात कोसळली कार, लेकीसाठी बापानेही घेतली उडी; थरारक व्हिडीओ समोर

वेगळा खेळ सुरु

यानंतर तिने वेगळा खेळ सुरु केला. तरुणीने त्याचा अश्लील व्हिडीओ बनवला. दुसऱ्या दिवशी तरुणाला फोन आला. समोरचा व्यक्ती गुन्हे शाखेचा अधिकारी राकेश अस्थाना असल्याचे सांगत होता. तो तरुणाला धमकी देऊ लागला. माझ्याकडे तुझ्याविरोधात तक्रार आली आहे. तू पैसे दिले नाहीस तर तुझे व्हिडीओ अपलोड केले जातील असे ब्लॅकमेलिंग त्याला होऊ लागले. यानंतर तरुणाने 33 हजाराची रक्कम जमा केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. दरम्यान अभियंता तरुणाला आपल्यासोबत लैंगिक शोषणासारखी घटना घडल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने वकिलाशी संपर्क साधला.

याप्रकरणी सोमवारी आयुक्त आणि डीसीपी यांच्याकडे मोबाईल क्रमांक आणि स्क्रीन शॉट देऊन तक्रार करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मुलीने रचली स्वत:च्या अपहरणाची कहाणी, घरच्यांना पाठवला अर्धनग्न व्हिडिओ; 'ती' एक चूक...

व्हिडीओ कॉल उचलू नका

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट येणे, त्यातून व्हॉट्सअॅपचा नंबर मागणे आणि व्हिडीओ कॉलवर कपडे काढून मग ब्लॅकमेल करणे हे प्रकार सर्रास होताना दिसतात. याबद्दल वारंवार जनजागृती करुनही अनेक तरुण या जाळ्यात अडकताना दिसत आहेत.सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवू नका, त्यांचे व्हिडीओ कॉल उचलू नका असे आवाहन करण्यात आले आहे.