नवी दिल्ली : जर तुम्ही फिरायला जाण्याचे नियोजन करीत असाल आणि विमान प्रवासाची निवड करणार असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता प्रवासादरम्यान एअरपोर्टवरून थेट घरापर्यंत तुमचा सामान पोहचवणं सोपं होणार आहे. याआधी पोर्टरचा खर्च, घरातून एअरपोर्टपर्यंत सामान आणणे आणि पुन्हा बोर्डिंग करून कन्वेयर बेल्टवर वाट पाहणे खूप कठिण होते. परंतु आता या सर्व अडचणी दूर करण्यासाठी इंडिगोने विशेष सेवा सुरू केली आहे.
इंडिगोची विशेष सेवा
इंडिगोच्या विशेष सेवेमध्ये तुमच्या घरापासून ते तुम्ही जेथे जाणार आहात, तिथे सामान पोहचवण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला सामान आणण्याची तसेच घेऊन जाण्यास अडचणी येणार नाही. इंडिगो आपल्या प्रवाशांसाठी डोअर टू डोअर बॅगेज सर्विस सुरू करणार आहे.
या शहरांमध्ये मिळणार सुविधा
Indigo ची ही विशेष सेवा सध्या बंगळुरू, दिल्ली, हैद्राबाद आणि मुंबईमध्ये सुरू करण्यात आली आहे. इंडिगोने म्हटले की, या सेवेअंतर्गत ग्राहकांच्या सामानाला व्यवस्थित आणि सुरक्षित पद्धतीने इच्छित स्थळी पोहचवले जाते.
शुल्क
या विशेष सेवेसाठी तुम्हाला 325 रुपये मोजावे लागतील. या सेवेचे नाव 6EBagport असे आहे. ज्यामाध्यमातून ग्राहक विमानाच्या उड्डाणाच्या 24 तास आधी बॅगेज सेवेचा लाभ घेऊ शकतील. या सर्विससाठी कंपनी कार्टपोर्टर (CarterPorter)सोबत पार्टनरशिप करणार आहे.
Indigo ने सुरू केल्या डायरेक्ट फ्लाइट
इंडिगोने दिल्ली-पटना, पटना -दिल्ली, पटना - मुंबई, आणि पटना - हैद्राबाद, बंगळुरू - पटना रुटवर 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरपासून नवीन डायरेक्ट फ्लाइटची सुरूवात केली आहे. इंडिगो ओडीसाच्या भुवनेश्वरपासून ते जयपूरपर्यंत जोडणारी थेट फ्लाइट 2 नोव्हेंबर पासून सुरू करणार आहे.