तुमची गाडी जास्त पेट्रोल खर्च करते का? वापरा या टीप्स आणि 20% पर्यंत मायलेज वाढवा

 देशभरात पेट्रोल - डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच प्रत्येक वाहन चालकाला वाटते की आपल्या वाहनाने कमी इंधन खर्च करायला हवे

Updated: Nov 7, 2021, 09:50 AM IST
तुमची गाडी जास्त पेट्रोल खर्च करते का? वापरा या टीप्स आणि 20% पर्यंत मायलेज वाढवा title=

मुंबई : देशभरात पेट्रोल - डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच प्रत्येक वाहन चालकाला वाटते की आपल्या वाहनाने कमी इंधन खर्च करायला हवे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या वाहनाचा मायलेज 20 टक्क्यांनी वाढवू शकता.

ट्रॅफिक सिग्नलवर इंजिन करा बंद
ट्रॅफिक सिग्नलवर लाल दिवा लागल्यास अनेक लोक आपल्या गाडीचे इंजिन सुरूच ठेवतात.परंतु जर ट्रॅफिक सिग्नल 30 सेकंदाहून अधिक असेल तर, आपल्या गाडीचे इंजिन बंद करणे योग्य ठरते. 

टायर प्रेशर संतुलित ठेवा
चालकांने गाडी चालवताना वाहनाच्या टायर प्रेशरकडे नेहमी लक्ष द्यायला हवे. टायर प्रेशर नेहमी मॅन्युफॅक्चरर गाइड प्रमाणेच असायला हवे. टायर प्रेशरचा थेट परिणाम मायलेजवर पडतो. 

दर्जेदार इंजिन ऑईल वापरा
गाडी सर्विसिंगच्यावेळी नेहमी दर्जेदार आणि चांगल्या गुणवत्तेचं इंजिन ऑईल वापरा. नेहमी मॅन्युफॅक्चरर द्वारा सूचवण्यात आलेल्या ऑईलचा वापर करा. यामुळे मायलेज आणि गाडीची लाइफ वाढेल.

गरज असेल तर एसीचा करा वापर
अनेकदा लोक गरज नसतानाही कारचा एसी सुरू ठेवतात. असे केल्याने गाडीचे इंधन अधिक खर्च होते. सकाळी किंवा सायंकाळी किंवा वातावरण ठिक असल्यास एसीचा वापर करण्यास टाळायला हवा.

नियमित सर्विसिंग गरजेची
गाडीचा मायलेज वाढवण्यासाठी गाडीचे इंजिन, क्लच, गिअर इत्यादी पार्ट्स चांगल्याप्रकारे काम करणे गरजेचे असते. त्यासाठी गाडीची नियमित सर्विसिंग गरजेची आहे. सर्विसिंग नेहमी ऑथराइज्ड वर्कशॉप किंवा विश्वासू मॅकॅनिककडून करणे आवश्यक असते. वेळोवेळी इंजिन ऑईल बदलणे, फ्युल आणि इग्निशन सिस्टिमचे चेकअप, जुने फिल्टर बदलणे सारख्या गोष्टींमुळे गाडीचे मायलेज वाढू शकते.