मुंबई : विमा क्षेत्रातील खासगी जीवन विमा कंपनी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सने (HDFC Life Insurance) शुक्रवारी एक्साइड लाइफ इन्शुरन्स (Exide Life Insurance) खरेदी करण्याची घोषणा केली आहे. एक्साइड लाइफ आपला विमा व्यवसाय विकण्यास सहमती दर्शवली आहे. हा करार 6 हजार 687 कोटी रुपयांचा झाला आहे. एचडीएफसी लाइफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी, एक्साइड इंडस्ट्रीज आणि एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या लोकांनी या कराराला मंजुरी दिली आहे.'
एक्साइड इंडस्ट्रीज ही, देशातील बॅटरी बनविणारी नंबर -1 कंपनी आहे. 2013 मध्ये कंपनीने आयएनजी वैश्य लाइफ इन्शुरन्स विकत घेतले. कंपनीकडे या विमा कंपनीचा आधीच 50 टक्के हिस्सा होता आणि आता त्याने उर्वरित भाग 550 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. Exide इंडस्ट्रीजने ING कडून 26 टक्के हिस्सा घेतला होता. यामध्ये कोठारी ग्रुपचा 16.32 टक्के आणि एनम ग्रुपचा 7.68 टक्के शेअर होता. ते देखील नंतर Exideने खरेदी केले होते.
त्यानंतर आता HDFC Life Insurance ने एक्साईड लाइफ इन्शुरन्समधील 100% शेअर खरेदी करणार आहे. यासाठी कंपनी एक्साइड इंडस्ट्रीजला 8 कोटी 70 लाख 22 हजार 222 शेअर्स 685 रुपये प्रति शेअर दराने विकणार आहे. या करारात 726 कोटी रुपयांचे रोख पेमेंट केले जातील. अशा प्रकारे, हा संपूर्ण करार 6 हजार 687 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होईल.
ग्राहकांचे काय होईल? तज्ञांचे म्हणणे आहे की, या कराराचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांचे धोरण आणि सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
याचा फायदा कोणाला होईल? एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स आणि एक्साइड इंडस्ट्रीज या दोन्हीमधील हा करार दीर्घकालीन आणि फायदेशीर करार आहे. या करारासाठी एक्साइड लाइफ इन्शुरन्स मूल्यांकन 28 ते 32 रुपये होते, परंतु हा करार 79 रुपयांच्या मूल्यांकनावर करण्यात आला आहे. म्हणजेच एक्साईडला यातून भरपूर पैसे मिळत आहेत.
त्यांचे म्हणणे आहे की, त्यामुळे एक्साईडचे शेअर्स अल्पावधीत तेजीत राहतील आणि त्यात पैसे गुंतवल्यास त्यातील शेअर आणखी 250 रुपयांपर्यंत मजबूत होऊ शकतील.
एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्हणाल्या की, या अधिग्रहणामुळे ग्राहक, कर्मचारी, भागधारक आणि डिस्ट्रीब्यूशनसाठी मूल्य निर्माण होईल. यामुळे आम्हाला आमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची आणि आमचे वितरण जाळे वाढवण्याची संधी मिळेल.
एक्साइड लाईफची दक्षिण भारतात विशेषतः टियर 2 आणि 3 शहरांमध्ये मजबूत उपस्थिती आहे. 30 जून 2021 रोजी एक्साइड लाइफचे एम्बेडेड मूल्य 2 हजार 711 कोटी रुपये आहे.