Physical Relationship : आजही समाजात काही मुद्द्यांवर न्यूनगंडापोटी मोकळेपणानं बोललं जात नाही. महिला असो वा पुरुष, काही मुद्द्यांवर ही मंडळी फार क्वचितच खुलेपणानं आपली मतं पुढे आणतात. अशाच एका अतीसंवेदनशील मुद्द्याबाबत थेट 'इंडियन नॅशनल फॅमिली सर्वे'नं नव्यानं आकडेवारी जाहीर केली आहे. जिथं भारतात अल्पवयीन मुलांमध्ये शरीरसंबंध ठेवण्याचं प्रमाण अधिक असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
इथं लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे या आकडेवारीमध्ये 39 टक्क्यांहून अधिक महिलांनी वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी शरीरसंबंध ठेवले आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 25 ते 49 वयोगटातील 10 टक्के महिलांनी आपण 15 वर्षांहून कमी वयातच शारीरीक संबंध ठेवल्याची बाब स्वीकारली. इथं, सहमतीचा मुद्दा मात्र विचारात घेतला नाही. 58 टक्के महिलांनी 20 वर्षांच्या वयात पहिल्यांदा हा अनुभव घेतला.
महिलांच्या तुलनेत पुरुषांनी वयाच्या 24 व्या वर्षी पहिलांदाच शरीरसंबंध ठेवल्याची बाब समोर आली असून, दोघांच्यायी वयांमध्ये 4 वर्षांचा फरक लक्षात येत आहे. सरासरी कारणं पाहता भारतात पुरुषांच्या तुलनेत महिला कमी वयातच विवाहबंधनात अडकतात ज्यामुळं त्यांची ही आकडेवारी जास्त दिसून येत असल्याचं प्राथमिक निष्कर्ष काढला जात आहे.
15 ते 19 वर्षे- 1.2 टक्के महिलांनी आपण 15 व्या वर्षीत शरीरसंबंध ठेवल्याचं कबुल केलं.
20 ते 24 वर्षे - या वयोगटातील 3.4 टक्के महिलांनी आपण 15 व्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्याची बाब स्वीकारली.
25 ते 29 वर्षे (6.5 टक्के), 30 ते 34 वर्षे (9.7 टक्के), 35 ते 39 वर्षे (11.3
टक्के), 40 ते 45 वर्षे (12.8 टक्के), 45 ते 49 वर्षे (12.7 टक्के) महिलांनी वयाच्या 15 व्या वर्षी पहिल्यांदाच शरीरसंबंध ठेवल्याचं सांगितलं.
20 ते 24 वर्षांच्या वयातील 21.0 टक्के महिलांनी आपण 18 व्या वर्षी पहिल्यांदाच शरीरसंबंध ठेवल्याचं सांगितलं. यामध्ये 30 ते 34 वर्षे (29.2 टक्के), 35 ते 38 वर्षे (42 टक्के) महिलांचंही हेच उत्तर मिळालं.
सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 25 वर्षे वयोगटातील जवळपास 85.7 टक्के महिलांनी पहिल्यांदाच शरीरसंबंध वयाच्या 25 व्या वर्षी ठेवले. तर, 49 वर्षे वयोगटातील 88.6 टक्के महिलांनीही आपण 25 व्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध अनुभवल्याचं सांगितलं.
पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात महिला आणि पुरुषांमध्ये शरीरीसंबंधांसाठीच्या वयामध्ये मोठा फरक पाहायला मिळाला. यामध्ये सर्वात मोठं कारण ठरत आहे विवाहसंस्था. देशातील बहुतांश महिला कमी वयातच लग्नबंधनात अडकतात ज्यामुळं त्यांना Physical Relations सुद्धा त्याच वयात ठेवावे लागतात. इंडियन नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या माहितीनुसार देशातील मोठ्या भागात आजही लग्नाआधीच्या शरीरसंबंधांना परवानगी नाही.
सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पातळीवर 48 टक्के महिला आणि 47 टक्के पुरुषांनी मागील चार आठवड्यांमध्ये Sex केल्याची बाब स्वीकारली. इथं लक्षात घेण्याची बाब म्हणजे ही आकडेवारी संभाषणावर आधारलेली आहे. त्यामुळं इथं महिलांची आकडेवारी जास्त असल्याचं लक्षात आलं. या सर्वेक्षणातून सदर मुद्द्यावर बरीच माहिती समोर आली.