नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्ण तडफडून प्राण सोडत आहेत. या बिकट परिस्थितीत ऑक्सिजन सिलेंडरचा तत्काळ पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वे ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेन चालवण्यास तयार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार रेल्वे ऑक्सिजन एक्स्प्रेसचे नियोजन येत्या काही दिवसातच करणार आहे. ही ट्रेन देशात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आमि ऑक्सिजन सिलेंडर पोहचवणार आहे.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सरकारांनी रेल्वेला संपर्क करून ऑक्सिजन टँकर चालवण्यावर विचार करावा असे म्हटले आहे. महाराष्ट्रातून रिकामे टँकर विशाखा पट्टनम, जमशेदपूर, राऊरकेला, बोकारोतून ऑक्सिजन घेतले जाईल.
भारतीय रेल्वे गतीने ठरलेल्या ठिकाणी पोहचावी यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे. जेणे करून तातडीने ऑक्सिजन रुग्णांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.