रेल्वेने मागच्या १० वर्षात भंगार विकून कमावले एवढे पैसे

भारतीय रेल्वेने मागच्या १० वर्षात भंगार विकून बक्कळ कमाई केली आहे. 

Updated: Oct 10, 2019, 10:25 PM IST
रेल्वेने मागच्या १० वर्षात भंगार विकून कमावले एवढे पैसे title=

मुंबई : भारतीय रेल्वेने मागच्या १० वर्षात भंगार विकून बक्कळ कमाई केली आहे. एका आरटीआयला उत्तर देताना मागच्या १० वर्षात रेल्वेने भंगार विकून ३५,०७३ कोटी रुपये कमावले आहेत. रेल्वे मंत्रालयाने मागच्या १० वर्षांमध्ये भंगारात काढलेल्या गोष्टींची माहिती दिली आहे. या माहितीमध्ये २००९-१० ते २०१८-१९ या कालावधीचा हिशोब देण्यात आला आहे. या १० वर्षात वेगेवेगळ्या वेळी भंगार विकून रेल्वेला ३५,०७३ कोटी रुपये मिळाले. यामध्ये रेल्वे कोच, वॅगन्स आणि पटरीच्या भंगाराचा समावेश आहे.

२०१४-१५ ते २०१८-१९ पेक्षा २००९-१० ते २०१३-१४ या कालावधीमध्ये रेल्वेला भंगारातून जास्त पैसे मिळाले. त्यामुळे शेवटच्या ५ वर्षांमध्ये रेल्वे पटरींमध्ये कमी बदलाव झाले आहेत. जर नवीन पटरी बसवली गेली, तर जुन्या पटरी भंगारात विकल्या जातात, यावरून हा निष्कर्ष निघू शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.