भारत-पाकिस्तान सीमेवर संशयित ड्रोन

भारत-पाकिस्तान सीमेवरील चौकीजवळ २५ कोटीचे ५ किलोग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले. 

Updated: Oct 10, 2019, 07:44 PM IST
भारत-पाकिस्तान सीमेवर संशयित ड्रोन  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानाच्या बाजूने सलग तीन दिवस ड्रोनच्या हालचाली दिसल्यानंतर भारतातर्फे शोधमोहीम उघडण्यात आली. यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवरील चौकीजवळ २५ कोटीचे ५ किलोग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले. ड्रोन हालचाली दिसल्यानंतर बीएसएफ पंजाब पोलीस आणि देशातील सुरक्षा यंत्रणांनी शोध सुरु केला होता. आज देखील ही शोधमोहीम सुरु आहे. 

मंगळवारी रात्री हुसैनवाला परिसरात पाकिस्तानचा संशयित ड्रोन दिसला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहीती दिली. गेल्या तीन दिवसात फिरोजपूरजवळ अशाप्रकारची तिसरी संशयित वस्तू दिसली. गावकऱ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या ड्रोनचे फोटो काढले. फिरोजपुरमध्ये रात्री आकाशात एक चमकणारी वस्तू दिसल्याचे स्थानिकांनी एका वृत्तवाहीनीला सांगितले.

भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती फिरोजपूर उपायुक्त चंद्र गैंद यांनी दिली. ड्रोन अथवा त्याद्वारे उतरवल्या गेलेल्या सामानाचा शोध सुरु आहे. सीमेजवळील सतलज नदीच्या किनाऱ्यावरही शोध सुरु असल्याचे ते म्हणाले. 

आतापर्यंत दोन ड्रोन जप्त करण्यात आले आहेत. एक गेल्या महिन्यात तर दुसरा तीन दिवसांपूर्वी तरन तारन जिल्ह्याच्या धाबल नगर येथे जळलेल्या अवस्थेत सापडला. काश्मीरातून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर या कारवाया अधिक वाढल्या आहेत. ड्रोन पाठवणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.