बंद होणार या ट्रेन?, वाढू शकतात तुमच्या अडचणी

25 पॅसेंजर तर, 2 मेल गाड्यांवर कोसळणार बंदीची कुऱ्हाड?

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 6, 2017, 09:36 AM IST
बंद होणार या ट्रेन?, वाढू शकतात तुमच्या अडचणी title=

नवी दिल्ली : वाढणारा खर्च आणि होणारा तोटा कमी करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्ड एक जुगाड करण्याचा विराचर करत आहे. हे जुगाड तोट्यातील रेल्वेगाड्या बंद करण्याबाबतचे असून, संभाव्य ट्रेनची नावेही निश्चित झाल्याचे वृत्त आहे. बंद केल्या जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये 'त्या' रेल्वेचा तर, समावेश नाही ना, ज्यातून तुम्ही नेहमी प्रवास करता.

25 पॅसेंजर तर, 2 मेल गाड्यांवर कोसळणार बंदीची कुऱ्हाड?

सूत्रांकडील माहितीनुसार, या निर्णयाचा फटका 25हून अधीक पॅसेंजर तर, 2 मेल ट्रेनलाही बसू शकतो. उत्तर रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2017मध्ये दिल्ली-एनसीआरदरम्यन चालणाऱ्या रेल्वेगाड्यांची एक यादी बोर्डाला देण्यात आली. यादीत उल्लेख केलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या कमालीची कमी होती. त्यामुळे अशा तब्बल 25 रेल्वे गाड्या बंद करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. तसेच, या गाड्यांमध्ये 25 पॅसेंजर रेल्वेपैकी, 23 गाड्या या कायमस्वरूपी बंद तर, इतर दोन गाड्यांचे थांबे कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी तेव्हा बोर्डाने मान्य केली नव्हती.

बंद होण्याची शक्यता असलेल्या रेल्वे गाड्यांचे मार्ग

 दिल्ली-फरूखनगर, दिल्ली-रोहतक, नवी दिल्ली-गाजियाबाद, आनंद विहार-मुरादाबाद, नवी दिल्ली-पानीपत, नवी दिल्ली-कुरुक्षेत्र, असे हे मार्ग आहेत.

 बंद होण्याची शक्यता असलेल्या रेल्वे गाड्या

- दिल्ली-फरूखनगर दरम्यान चालणाऱ्या - 51915/16,

- रोहतक-दिल्ली दरम्यान चालणाऱ्या -  64916/13

- नवी दिल्ली-गाजियाबाद दरम्यान चालणाऱ्या -  64431/50/49/28

- आनंद विहार-मुरादाबाद दरम्यान चालणाऱ्या  - 64554/53

- आनंद विहार-मेरठ सिटी दरम्यान चालणाऱ्या  - 64554/55/56

- नवी दिल्ली-पानीपत दरम्यान चालणाऱ्या  - 64466

- नवी दिल्ली-कुरुक्षेत्र दरम्यान चालणारी  - 64463

- शकूरबस्ती गाजियाबाद दरम्यान चालणारी  - 64036

- कुरुक्षेत्र-अंबाला कॅंट दरम्यान चालणाऱ्या  - 64483

- रोहतक-पानीपत दरम्यान चालणाऱ्या  - 54025/26

- निजामुद्दीन सर्क्युलर दरम्यान चालणारी  - 64092

- निजामुद्दीन शकूरबस्ती दरम्यान चालणाऱ्या  - 64093/96

- नवी दिल्ली-शकूरबस्ती दरम्यान चालणाऱ्या  - 64096/97

- फरूखनगर-गढ़ी हरसरू दरम्यान चालणारी  - 74034

वर उल्लेख केलेल्या सर्व रेल्वे गाड्या कायमस्वरूपासाठी बंद करण्यात आल्याचे समजते.