दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत ६ हजार ८९१ पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, आताच अर्ज करा

. रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

Updated: Oct 6, 2021, 10:15 PM IST
दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत ६ हजार ८९१ पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, आताच अर्ज करा title=

मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये किंवा सरकारी नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने विविध पदांवर रिक्त जागांवरती भरती सुरू केली आहे. यासाठी रेल्वेने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती पूर्णपणे नोकरीसाठी नसली तरी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, अप्रेंटिसमुळे उमेदवाराला रेल्वेत नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसेच अप्रेंटिसदरम्यान तुम्हाला पगार म्हणजेच तुमचं स्टाइपेंड तुम्हाला देण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना अधिसूचनेनुसार भारतीय रेल्वे rrcnr.org च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर आहे. त्यामुळे वेळ न घालवता आताच अर्ज करा.

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिसच्या विविध विभागासाठी एकूण ६ हजार ८९१ पदांसाठी भरती काढली आहे. ज्यात वेगवेगळ्या ट्रेड्सच्या जागा भरल्या जाणार आहेत. या रेल्वे भरतीशीसंबंधीत सविस्तर माहिती जाणून घ्या.

महत्वाच्या तारखा

अर्जाची तारीख- 20 सप्टेंबर
अर्जीची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर

एकूण पद

६ हजार ८९१

पात्रता

उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डाच्या शाळेतून १० वी पास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे.
संबंधित क्षेत्रातील आयटीआयचं प्रमाणपत्र असावं.

वयोमर्यादा

१५ ते २४ वर्षे.

निवडप्रक्रिय

योग्य उमेदवाराला कुठल्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही.

उमेदवाराची निवड १० वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे आणि याची मेरिट लिस्ट लावली जाईल.

रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१ च्या माध्यमातून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत विविध ट्रेड्ससाठी ४३२ जागा भरल्या जातील. तर उत्तर रेल्वेत ३ हजार ९३ आणि ईस्टर्न रेल्वेमध्ये ३ हजार ३६६,जागांसाठी भरती काढण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरतीच्या अधिक माहितीसाठी apprenticeshipindia.org या वेबसाईटवर भेट देऊन माहिती घेऊ शकता, तसेच तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील दाखल करू शकता. निवडलेल्या उमेदवाराला अप्रेंटिसशिपच्या काळात सॅलरी, स्टाइपेंड देण्यात येईल.