#DeshKaZee : Invesco च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, इनवेस्कोची नोटिस अवैध

#DeshKaZee : Invesco च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ZEEL ची NCLT मध्ये धाव

Updated: Oct 6, 2021, 10:09 PM IST
#DeshKaZee : Invesco च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, इनवेस्कोची नोटिस अवैध title=

नवी दिल्ली: ZEEL झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि सोनी पिक्चर्स एकत्र येण्याची घोषणा झाल्यानंतर इनवेस्कोने खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामागे कोणी षडयंत्र रचत आहे का असा प्रश्न आता पडला आहे. याचं कारण म्हणजे इनवेस्को या प्रकरणी पारदर्शकता न ठेवता आता अनेक प्रश्नांपासून पळ काढत आहे. त्यामुळे इनवेस्कोच्या अडचणी वाढत आहेत. 

इनवेस्कोच्या अर्जाविरोधात झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसने नॅशनल कंपनी लॉ ट्राइब्यूनलमध्ये अर्ज दाखल केला. याशिवाय कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. इनवेस्कोची नोटीस अवैध असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. इनवेस्कोला ZEEL च्या बोर्डात बदल हवा आहे. पुनीत गोयंका यांना पदावरून हटवण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. 

इनवेस्कोने 6 नावं देखील पाठवली आहेत. हा बदल कोणत्या कारणासाठी हवा याचं उत्तर मात्र इनवेस्कोकडे नाही. या प्रकरणी इनवेस्को कोणतीही पारदर्शकता दाखवत नाही. बोर्डमध्ये मोठे बदल कऱण्याची मागणी आहे. अशा परिस्थितीमध्ये इनवेस्कोच्या हेतूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच वेळी, आता ZEE च्या वतीने NCLTकडे अर्ज केल्याने इनवेस्कोच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

डॉ. सुभाष चंद्रा यांची संपूर्ण मुलाखत ZEEL च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार झील कंपनी कायद्याद्वारे निर्णय घेत आहे. त्यानुसार लॉ अपीलेट ट्रिब्यूनलमध्ये ZEELने अर्ज दाखल केला. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार इनवेस्को डेवलपिंग मार्केट्स फंड आणि OFI ग्लोबल चाइना फंड LLC कडून पाठवण्यात आलेली नोटीस अवैध आहे.

ZEEL कंपनी भागधारकांच्या हिताचाच विचार करून निर्णय घेईल. असा विश्वास देखील ZEEL च्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला आहे. ZEEL-Sony डीलमध्ये पाय घालण्याचे काम इनवेस्को करत आहे. या डीलमध्ये इनवेस्कोला काही बदल हवे आहेत मात्र कशासाठी? याची उत्तरं मात्र त्यांच्याकडे नाहीत. इनवेस्कोमागून नेमकं कोण हे षड्षयंत्र रचतंय असा प्रश्न आणि इनवेस्कोच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होत आहे. या सगळ्यापासून इनवेस्को आता दूर पळतंय.

ZEE ने या प्रकरणी मोहीमही सुरू केली आहे. चीनचे षड्यंत्र पाहून झीने #DeshKaZee  मोहीम सुरू केली आहे. या हॅशटॅगमध्ये सामील होऊन तुम्ही देशातील पहिल्या आणि भारतीय वाहिनीला देखील समर्थन देऊ शकता. तुम्हाला सांगू, बॉलिवूडच्या दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांनीही ZEE च्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. यामध्ये सुभाष घई, सतीश कौशिक, बोनी कपूर, मधुर भांडारकर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.