Indian Railway : तुम्हाला माहित आहे एका मिनिटात रेल्वेच्या किती तिकिटांचं होतं बुकिंग?, आकडा वाचून व्हाल थक्क

देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो संख्येने गावातील तसेच शहरातील असंख्य लोकं रेल्वेने प्रवास करत असतात. 

Updated: Aug 7, 2022, 07:44 PM IST
Indian Railway : तुम्हाला माहित आहे एका मिनिटात रेल्वेच्या किती तिकिटांचं होतं बुकिंग?, आकडा वाचून व्हाल थक्क title=

Indian Railways : भारतीय रेल्वेने आज देशभरातील असंख्य लोकं प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो संख्येने गावातील तसेच शहरातील असंख्य लोकं रेल्वेने प्रवास करत असतात. त्यामुळे भारतीय रेल्वेही तत्परतेने नागरिकांसाठी विविध सुविधाही आणत असते. 

आता रेल्वे टिकीटासाठी तूम्हाला कुठल्याही टिकीट काऊन्टरवर जायची गरज नसते तर ऑनलाईनद्वारे तूम्ही सहजपणे आता घरबसल्या रेल्वेचे तिकिट बुक करू शकता. ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी IRCTC वेबसाइट आणि अॅपचा वापर केला जातो. पण तूम्ही कधी हा विचार केला आहे का, की दिवसाला सोडा पण दर मिनिटाला देशभरातून किती तिकीटे बुक होतात ते? 

याचे उत्तर आहे दर मिनिटाला हजारो लोक तिकीटं बुक करतात आणि समोर आलेल्या माहितीनुसार एका मिनिटाला 25 हजारांहूनही जास्त तिकिटे बुक होत होत असतात. 

डेटा पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत! 
भारतीय रेल्वे तिकीट बुकिंगसाठी नेक्स्ट जनरेशन ई-तिकीटिंग (NGET) सिस्टिम चालवली जाते. ही सिस्टिम दरवेळेला अपडेट होत असते. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार यंत्रणेद्वारे दर मिनिटाला हजारो लोक तिकीट बुक करतात. 2016-17 मध्ये प्रति मिनिट 15,000 तिकिटे, तर 2017-18 मध्ये प्रति मिनिट 18,000 आणि 2018-19 मध्ये 20,000 प्रति मिनिट तिकिटे बुक करण्यात आली आहेत. IRCTC वेबसाइटमध्ये प्रति मिनिट 25,000 पेक्षा जास्त तिकिटे बुक करण्याची क्षमता आहे. 5 मार्च 2020 रोजी एका मिनिटात 26,458 तिकिटे बुक झाली होती जो आकाडा विक्रमी ठरला. 

काय आहे नवीन अपडेट? 
आता तुम्ही IRCTC च्या एका यूजर आयडीने एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकता. मात्र एका यूजर आयडीवरून सकाळी 8 ते 10 या वेळेत एका दिवसात फक्त दोनच तिकिटे बुक करता येतील. ज्यांचे आधार कार्ड IRCTC खात्याशी लिंक आहे तेच या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.