मुंबई : अनेकदा मोठ्या प्रवासात ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशाचा डोळा लागतो आणि प्रवाशांना ज्या स्थानकावर उतरायचे असते ते सोडून तो पूढच्या काही स्टेशनवर जाग आल्यावर उठतो. यावेळी टीसीने पकडल्यावर आर्थिक नुकसान होते आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर आता रेल्वे एक सेवा घेऊन आली आहे. ही सेवा जाणून घेऊयात.
इंडियन रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी नवीन सेवा घेऊन आली आहे. त्यापैकी एक सेवा म्हणजे डेस्टिनेशन अलर्ट. ही सेवा रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वी सतर्क राहण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. सेवेचा एक भाग म्हणून, वापरकर्त्यांना त्यांच्या नियुक्त स्टेशनच्या 20 मिनिटे आधी एक एसएमएस आणि कॉल येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याच्या डेस्टीनेशनआधी अलर्ट होणार असून निश्चितस्थळी उतरणार आहेत.
डेस्टिनेशन अलर्ट कसा सेट करायचा?