मुंबई : भारतीय रेल्वे ही देशाची लाइफलाईन मानली जाते. दररोज ही लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छीत स्थळी पोहोचवते. भारतीय रेल्वेचे विशाल जाळे देशाच्या प्रत्येक भागात पसरलेले आहे. जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला 3 ते 4 महिने आधी तुमचे तिकीट बुक करावे लागते. जेणेकरून तुम्हाला तुमची सिट मिळेल आणि तुम्ही नियोजित दिवशी तुमचा प्रवास आरामात पूर्ण करू शकाल. आपल्यापैकी जवळ-जवळ सर्वांनी एकदातरी ट्रेन बुक केलेली असावी स्लीपर, एसी, चेअर कार किंवा सेकंड क्लास सीटिंगमध्ये प्रवासासाठी तुम्ही तिकीट बुक केले असणार. परंतु तुम्ही तुमच्याकडील तिकीटला निट पाहिले आहे का? त्यावर खूप काही लिहिलेले असते. त्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?
ट्रेनच्या आरक्षण तिकिटवर अनेक महत्वाची माहिती लिहिलेली असते. जर तुमचे तिकीट वेटिंगलिस्टमध्ये असेल, तर तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, ते वेटिंग लिस्टच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. कारण वेटिंग लिस्टची कॅटेगरी ही वेगवेगळी असते.
पीएनआर म्हणजे प्रवाशांचे नाव रेकॉर्ड होते. आपल्या तिकिटावरील हा सर्वात महत्वाचा कोड आहे. आरक्षण तिकिटाच्या वरच्या डाव्या बाजूला पीएनआर क्रमांक लिहिला असतो. हे कोणाचे तिकीट आहे हे या कोडवरून स्पष्ट होते. तुमच्या तिकिटाचा PNR क्रमांक TCकडे देखील असतो जो तुमचे तिकीट तपासण्यासाठी उपयुक्त ठरतो.
ट्रेनच्या तिकिटावर लिहिलेल्या या शॉर्ट फॉर्मचा अर्थ आहे सामान्य प्रतीक्षा यादी. तिकिटामध्ये असे लिहिले आहे, जेव्हा एखादा प्रवासी मूळ स्थानकावरून किंवा जवळच्या स्थानकांवरून प्रवास सुरू करतो. प्रतीक्षा यादीमध्ये हा कोड सर्वसामान्य आहे. अशी तिकिटे पक्की होण्याची शक्यता जास्त आहे.
वर्ष 2016 पूर्वी, तत्काळ कोटा वेटींग लिस्टला CKWL च्या कोडद्वारे देखील ओळखले जात होते. TQWL म्हणजे तत्काळ कोटा वेटिंग लिस्ट. जर तात्काळ यादीतून कोणतेही तिकीट रद्द केले गेले, तर असा कोड लिहिलेल्या तिकिटांना सर्वोच्च प्राधान्य असते आणि अशी तिकिटे पहिली कन्फर्म केली जातात. तथापि, या श्रेणीमध्ये रिझरवेशन अगेंस्ट कॅन्सलेशन (RAC) चा पर्याय उपलब्ध नसतो. जर हे तिकीट कन्फर्म झाले नाही, तर ते आपोआप रद्द होते आणि पैसे तुमच्या खात्यात जमा होतात.
PQWL म्हणजे पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट. या अंतर्गत लहान स्थानकांसाठी कोटा दिला जातो. या श्रेणीची वेटिंग लिस्ट क्लिअर होण्यासाठी दुसरे कोणाचेही कन्फर्म तिकीट रद्द करणे आवश्यक आहे. यामध्ये त्या प्रवाशांसाठी तिकीट बुक केले जाते, जे ट्रेनच्या सुरुवातीपासून ते काही स्थानकांपर्यंतच प्रवास करु शकतात.