भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर... 8500 स्टेशनवर मिळणार फ्री वाय - फाय

भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 9, 2018, 10:16 PM IST
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर... 8500 स्टेशनवर मिळणार फ्री वाय - फाय  title=

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. 

देशातील 216 या मोठ्या स्टेशनांवर आता प्रवाशांना मोफत वाय - फाय मिळणार आहे. मंगळवारी सुरू झालेल्या या योजनेचा फायदा 70 लाख लोकांना होणार आहे. 216 रेल्वे स्टेशनांवर फ्री वाय - फाय देणं ही एक सुरूवात आहे. यानंतर देशातील ग्रामीण भागांत 8500 रेल्वे स्टेशनांवर फ्री वाय - फाय मिळणार आहे. 

ग्रामीण भागातही मिळणार फ्री वाय - फाय 

केंद्र सरकारच्या या योजनेत देशातील 1,200 मोठ्या स्टेशनांवर प्रवाशांना फ्री वाय - फाय मिळणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील 7300 रेल्वे स्टेशन देखील यामध्ये समाविष्ट केले आहेत. इथे फक्त प्रवाशांनाच नाही तर ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना देखील या वाय फायचा फायदा होणार आहे. 

2018 मध्ये 600 स्टेशनांवर मिळणार फ्री वाय फाय 

रेल्वे मंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकारी सांगतात की, 2018 च्या अखेरीपर्यंत देशात 600 स्टेशनांवर फ्री वाय फाय सेवा मिळणार आहे. 2019 पर्यंत 8500 हजार स्टेशनांवर फ्री वाय - फाय देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.