रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशानं मोबाईल चार्जिंग प्लगचा केला 'असा' वापर; शिक्षा अशी मिळाली की...

Indian Railway News : धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना रेल्वे विभागाकडून विविध सोयीसुविधा पुरवण्यात येतात. पण, त्यांचा योग्य वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं.  

सायली पाटील | Updated: Jan 15, 2024, 12:24 PM IST
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशानं मोबाईल चार्जिंग प्लगचा केला 'असा' वापर; शिक्षा अशी मिळाली की...  title=
Indian railway Electric Kettle plug into mobile charger passanger gets fined

Indian Railway News : रेल्वे प्रवासादरम्यान अनेक असे किस्से घडतात जे किस्से पाहून अनेकदा इतरांना चांगलाच धडा मिळतो. प्रवासात काय करावं हे तर सगळेच सांगतात पण, अनेकदा सहप्रवासी काय करु नये यासंदर्भातील माहिती नकळतच देऊन जातात. अशीच एक घटना नुकतीच एका रेल्वे प्रवासादरम्यान घडली, ज्यामुशं इतरांनीही कानाला खडाच लावला. कारण, एला क्षुल्लक चुकीमुळं रेल्वे प्रवाशाला मोठा धडाच मिळाला आहे. 

रेल्वे प्रवासात नेमकं काय घडलं? 

नुकतंच लेह येथील एका प्रवाशानं रेल्वेमध्ये एक लहानशी चूक केली. या प्रवाशानं रेल्वेतील मोबाईल चार्जिंगसाठी देण्यात आलेल्या पॉईंटवरून इलेक्ट्रिक केटलच्या मदतीनं पाणी गरम करण्याचा प्रयत्न केला. बस्स, मग काय ही एक चूक त्याला महागात पडली. रेल्वे प्रवासादरम्यान पाणी गरम करणं किंवा चहा बनवणं वगैरे कामं अनेकदा संकटाना बोलावणं धाडण्यास कारणीभूत ठरतात. ज्यामुळं सहप्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या एका कारणामुळं रेल्वेत इलेक्ट्रिक केटलनं पाणी गरम करणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेत ताकिद दिली. 

अलीगढ़ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF)च्या माहितीनुसार शनिवारी गया येथून नवी दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या महाबोधि एक्सप्रेसमध्ये मोबाइल चार्जिंग पॉइंटवर किटलीच्या सहाय्यानं पाणी गरम करू पाहणाऱ्या 36 वर्षीय प्रवाशाला ताब्यात घेतलं गेलं. या प्रवाशाच्या कृत्यामुळं रेल्वे कायद्याअंतर्गत येणाऱ्या कलम 147(1) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि त्याला अलीगढ न्यायालयापुढं सादर करम्यात आलं. 

हेसुद्धा वाचा : प्रभू श्रीराम यांच्या बहिणीचं नाव माहितीये? जाणून घ्या रामायणातील रहस्यमयी संदर्भ 

रेल्वे पोलिसांनी या प्रवाशाकडून 1000 रुपयांचा दंडही वसूल करत त्याला सक्तीची ताकिद देत परत पाठवलं. प्रवाशाच्या इलेक्ट्रिक केटल लावण्याच्या कृत्यामुळं शॉट सर्किट होण्याची शक्यता होती. ज्यामुळं रेल्वेच्या एसी 3 डब्यामध्ये आग लागू शकत होती. ही अतिशय गंभीर बाब असल्यामुळं रेल्वेकडून या प्रवाशाला दंड ठोठावण्यात आला. रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा प्रवाशांसाठी काही नियम आखून दिलेले असतात. या नियमांचं पालन प्रवाशांनी करणं अपेक्षित असतं. पण, अनेकदा या नियमांचं उल्लंघ होतं आणि सरतेशेवटी प्रवाशांवर कारवाई करण्यावाचून दुसरा पर्याय रेल्वेकडे नसतो. आता तुम्हीही रेल्वेनं प्रवास करणार असाल, तर अशा चुका करून सहप्रवासी आणि आपला जीव धोक्यात घालू नका. एक जबाबदर प्रवासी म्हणून नियमांचं पालन करा.