तुझ्यामुळंच...! 'मुलाला का मारलं?' विचारताच सूचनाच्या उत्तरानं पतीला धक्का

Suchna Seth Case Update: देशात सध्या सूचना सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच मुलाची हत्या केली.

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 15, 2024, 10:53 AM IST
तुझ्यामुळंच...! 'मुलाला का मारलं?' विचारताच सूचनाच्या उत्तरानं पतीला धक्का title=
Suchana Seth husband confronted by Goa Police over 4 year old son's murder

Suchna Seth Case Update: बेंगळुरु येथील एका AI कंपनीची सीईओ सूचना सेठ हिने तिच्याच चार वर्षांच्या मुलाची निर्घृण खून केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. सूचनाने मुलाला का संपवले? हा प्रश्न अनेकांच्या डोक्यात घोळत आहे. खुद्द सूचनाचा पतीही मुलाच्या विरहाने व्याकुळ झाला आहे. पोटच्या मुलाचे अशारितीने जाणे त्याच्याही मनाला लागले आहे. मुलाच्याच आईने त्याची हत्या का केली असावी, असा प्रश्न वेंकट रमनला पडला आहे. 14 जानेवारी रोजी रमन आणि सूचना यांची 15 मिनिटांसाठी भेट झाली. या भेटीत रमनने सूचना यांच्यात खूप वाद झाल्याचेही समोर आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी रोजी पोलिसांच्या उपस्थितीतच सूचना आणि तिच्या पतीची भेट झाली. 15 मिनिटांसाठी झालेल्या या भेटीत दोघांत खूप वाद झाले. या दरम्यान रमण यांनी संतापाच्या भरात सूचनाला तिच्या वागण्याचे कारण विचारले. तु मुलाला नाही मारलेस तर कोणी मारले? असा सवाल केला. त्यावर सूचना शांत बसली. ती कोणतेच उत्तर देण्यास तयार नव्हती. दोघांमध्ये खूप वेळापासून वाद सुरू होते. त्यानंतर वेंकट रमनने गोवा कलंगुट पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकट रमन आणि सूचना सेठ यांना एकमेकांना सामोरे जायचे नव्हते. मात्र, पोलिसांनी जबरदस्ती त्यांना एकमेकांसमोर आणले आणि चौकशी केली. यादरम्यान वेंकट सातत्याने मुलाच्या हत्येसाठी सूचनाला जबाबदार धरत होता. मात्र ती सतत हा आरोप फेटाळत होती. इतकंच नव्हे तर, या घटनेसाठी पती वेंकट रामनलाच जबाबदार धरत होती. तुझ्यामुळंच हे सगळं घडल्याचं वारंवार सांगत होती. 

वेंकट रामन यांने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी मुलाची हत्या झाली तेव्हा ते इंडोनिशेयात कामाच्या संदर्भात गेले होते. पोलिसांकडून मुलाची हत्या झाल्याची माहिती 9 जानेवारी रोजी मिळाली. नंतर लगेचच ते भारतात येण्यासाठी रवाना झाले. 10 जानेवारी रोजी बेंगळुरुत पोहोचून त्यांनी मुलावर अंतिम संस्कार केले. 

मुलाची हत्या का केली? 

सूचना सेठ आणि तिच्या पतीचा घटस्फोट झाला होता. त्यामुळं काहीही झाले तरी सूचनाला मुलाला व्यंकटला भेटू द्यायचे नव्हते. सूचना सेठ हिने 5 आठवड्यांपर्यंत कोर्टाचा आदेश अमान्य केला व मुलाला व पतीला भेटू दिले नाही. सूचना सेठ आणि वेंकट रमण यांच्यात गेल्या एक वर्षांपासून वाद सुरू आहेत.