देशात लॉन्च झाली सर्वात महागडी बाईक

बाईकमध्ये अनेक जबरदस्त फीचर

Updated: Aug 13, 2018, 04:07 PM IST
देशात लॉन्च झाली सर्वात महागडी बाईक title=

मुंबई : इंडियन मोटरसायकलने भारतात टॉप-ऑफ-द-लाइन मॉडल लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 38 लाख रुपये ठेवली आहे. नवी इंडियन चीफटेन एलीटमध्ये फीचर्सला स्टँडर्ड व्हर्जनमध्ये स्पेशल अपग्रेड केलं गेलं आहे. या बाईकमध्ये बीस्पोक पेंट जॉब, अतिरिक्त इक्विपमेंट, कस्टम लेदर सीट्स सारखे फीचर्स दिले आहेत.

फक्त 350 बाईक बनणार

इंडियन चीफटेन एलीटची मागच्य़ा वर्षी घोषणा झाली होती. जगभरात फक्त 350 बाईक बनणार आहेत. इंडियनची ही दुसरी लिमिटेड एडिशन बाईक आहे. याआधी कंपनीने रोडमास्टर एलीटने यावर्षीच्या सुरुवातील लॉन्च केली होती.

बाईक पेंटसाठी 25 तास

2018 इंडियन चीफटेन एलीटमध्ये नवी पेंट स्कीम देण्यात आली आहे. कंपनीच्या मते संपूर्ण बाईकला पेंट करण्यासाठी 25 तास लागले आहेत. क्रूजरमध्ये इंडियन राइड कमांड इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. जो ब्लूटूथ कनेक्टिविटी, नेविगेशन आणि 200-वॅट प्रीमियम ऑडियो सिस्टम देखील देण्यात आलं आहे. याशिवाय बाईकमध्ये कस्टम लेदर सीटची शिलाई आणि अॅल्यूमीनियम फ्लोरबॉर्ड्स देण्यात आलं आहे.

1811 सीसी बाईक

या बाईकमध्ये थंडरस्ट्रोक 111 व्ही-ट्विन इंजिन देण्यात आलं आहे. जे चीफटेन रेंजच्या इतर बाईकमध्ये देखील देण्यात आलं आहे. हे इंजिन 3,000 आरपीएमवर 161.6 न्यूटन मीटरचं पीक टॉर्क जनरेट करतं. जे स्टँडर्ड मॉडलच्या तुलनेत 11.6 न्यूटन मीटर अधिक आहे. टेलिस्कॉपिक फ्रंट फोर्क्स आणि रिअर मोनोशॉक सस्पेंशन सेटअप समान आहे.