सावधान! वकिलाच्या खिशात या कंपनीच्या मोबाईलचा ब्लास्ट, तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा?

सावधान! वकिलाच्या खिशात या कंपनीच्या मोबाईलचा ब्लास्ट, तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा?   

Updated: Sep 10, 2021, 03:55 PM IST
सावधान! वकिलाच्या खिशात या कंपनीच्या मोबाईलचा ब्लास्ट, तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा?    title=

नवी दिल्ली: फोन चार्जिंगला लावल्यानंतर स्फोट झाल्याचा किंवा खिशातच स्फोट झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत आहे. वकिलाच्या खिशात स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या कंपनीच्या फोनबाबत हा दुसरा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी बंगळुरूमध्ये अशी घटना घडली होती. 

भारतात OnePlus Nord 2 स्मार्टफोन बऱ्यापैकी लोक वापरतात. अनेक जण ते घेण्याचा विचारही करत असतील तर थांबा. वकिलाच्या खिशात OnePlus Nord 2 फोनचा ब्लास्ट झाला आहे. MySmartPrice ने दिलेल्या वृत्तानुसार गौरव गुलाटी नावाच्या ट्विटर यूझरने आपला OnePlus Nord 2 मोबाईलचा ब्लास्ट झाल्याची माहिती दिली आहे. 

OnePlus Nord 2 ब्लास्ट होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट असल्याचं कारण सांगितलं जात आहे. भारतीय वकिलाने दावा केला की त्याला फोन गरम झाल्याची जाणीव झाली. फोन खूप जास्त गरम झाल्याने त्यांनी कोट बाजूला फेकून दिला. त्याचा स्फोट झाला आणि फोनला आग लागली. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. 

वकिलांच्या म्हणण्यानुसार या फोनची बॅटरी 90 टक्के होती. वन प्लसने गौरव गुलाटी यांना संपर्क केला. कंपनीने आपला फोन जमा करण्यास सांगितलं. मात्र गौरव गुलाटी यांनी कायद्याचा मार्ग निवडला. त्यांनी आपला स्फोट झालेला  OnePlus Nord 2 मोबाईल पोलिसात जमा केला. या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. याशिवाय फोनची विक्री रोखण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे. 

कंपनीने आम्ही वकिलाकडे हा फोन मागितला असून त्याची तपासणी करायची असल्याचं सांगितलं आहे. मात्र वकील त्यासाठी फोन देत नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण काय नवीन वळण घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.