Coronavirus : तपासणीकरता 'खास' मशीन, एका दिवसात हजार चाचण्या करणार

एका दिवसांत एवढ्या टेस्ट 

Updated: May 15, 2020, 11:42 AM IST
Coronavirus : तपासणीकरता 'खास' मशीन, एका दिवसात हजार चाचण्या करणार  title=
मुंबई : देशात कोरोना व्हायरसबाबत एक चांगली आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्या सर्वाधिक प्रमाणात होणं गरजेचं आहे. चाचणीसाठी खास एक मशीन COBAS ६८०० आणण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही मशीन एनसीडीसी म्हणजे नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलला सुपूर्त केली आहे. आतापर्यंत १ लाख सँपलची तपासणी करण्यात आली आहे. कोरोना टेस्ट ५०४ सरकारी लॅबसोबतच खासगी लॅबमध्ये देखील करण्यात येत आहे. 

एका दिवसांत एवढ्या टेस्ट 

एनसीडीसी सेंटरमध्ये या नव्या टेक्नॉलॉजीच्या मशीननेच चाचणी केली जाणार आहे. या मशिनीच्या माध्यमातून १२०० सँपल टेस्ट केले जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे ही मशीन एकाचवेळी अनेक सँपल टेस्ट करू शकते. COBAS 6800 या मशिनीकरता जवळपास BSL2 आणि कंट्रोल लेवलची लॅब आवश्यक आहे. या मशीनला कोणत्याही फॅसिलिटीवर ठेवू शकत नाही. COBAS ६८०० व्हायरल हॅपेटाइटिस बी एँड सी, एचआयवी, एमटीबी, पैपिलोमा, सीएमवी, क्लॅमाइडिया आणि नेयसेरेमिया सारख्या रोगांची लक्षण देखील समजतात.
 
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की,'ही मशीन रोबोटिक्स आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना इंफेक्शनचा खतरा खूप कमी आहे. तसेच कमी वेळेत जास्त टेस्टचा रिझल्ट मिळणार आहे.' 'कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दुप्पट होण्याचा कालावधी गेल्या तीन दिवसांपासून कमी झाला आहे. हे प्रमाण १३.९ टक्क्यांवर पोहोचली आहे.'
 
देशात कोरोनाचं संक्रमण वाढत चाललं आहे. आरोग्यमंत्र्यांकडून आकडेवारी जाहिर करण्यात आली आहे. देशात कोरोना व्हायरसची संख्या ही ८१,९७० पोहोचली आहे. तसेच २७,९२० कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. मृतांचा आकडा २६४९ पर्यंत पोहोचला आहे.