सैन्यदल अधिकाऱ्याने तयार केलं स्नायपर बुलेटप्रूफ जॅकेट

या जॅकेटला त्यांनी एक नावही दिलं आहे. 

Updated: Dec 24, 2019, 09:02 AM IST
सैन्यदल अधिकाऱ्याने तयार केलं स्नायपर बुलेटप्रूफ जॅकेट  title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : शेजारी राष्ट्राकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि घुसखोरी पाहता indian army भारतीय सैन्यदलाकडून त्या दृष्टीने अधिक सतर्क पावलं उचलण्यात येत आहेत. त्याचाचच प्रत्ययही आला आहे. पाकिस्तानकडून केले जाणारे स्नायपर हल्ले रोखून धरण्यासाठी सैन्यदल अधिकारी अनूप मिश्रा यांनी एक नवं तंत्र विकसित केलं आहे. 

'सर्वत्र' या नावाने त्यांनी एक बुलेटप्रूफ जॅकेट तयार केलं आहे. ज्यामुळे sniper bullet लेथल स्नायपर रायफल्सचा हल्ल्याचा प्रतिकार करणं शक्य होणार आहे. याचविषयी अनूप मिश्रा यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली. 'आम्ही एक असं बुलेटप्रूफ जॅकेट तयार केलं आहे, ज्याची निर्मिती पुण्यातील सैन्यदल अभियांत्रीकी महाविद्यालयात करण्यात आली आहे. ज्याच्या माध्यमातून स्नायपर रायफल्सच्या बुलेटपासून संपूर्ण शरीराचं संरक्षण करता येणार आहे', असं मेजर अनूप मिश्रा म्हणाले. 

अतिशय अद्ययावत अशा कार्यप्रणालीतून साकारण्यात आलेल्या या जॅकेटसाठी आणि या यशस्वी प्रयत्नासाठी मेजर मिश्रा यांना सैन्यदल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते आर्मी डिझाईन ब्युरो एक्सेलेंस अवॉर्ड देण्यात आला. सोमवारी पार पडलेल्या आर्मी टेक्नोलॉजी सेमिनारमध्ये त्यांना गौरवण्यात आलं. 

'या' दिवशी होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी

का होती अशा बुलेटप्रूफ जॅकेटची गरज? 

स्नायपर बुलेटप्रूफ जॅकेटची निर्मिती करण्यामागचा उद्देशही मिश्रा यांनी स्पष्ट केला. नियंत्रण रेषेवर स्नायपरचा वापर करत होणारे हल्ले पाहता जवानांच्या संपूर्ण शरीराचं संरक्षण केलं जाणं महतत्वाचं आणि तितकंच गरजेचं होतं, याच गरजेतून या जॅकेटची निर्मिती झाली. 

मुख्य म्हणजे या जॅकेटच्या सर्व चाचण्या पार पडल्या आहेत. तेव्हा आता येत्या काळात भारतीय सैन्यदलाकडून या जॅकेटसाठीचं अधिकृत टेंडर काढत संबंधितांना त्यांच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.