"मी मरायला आलो आहे"; आत्मघाती हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला अटक

नियंत्रण रेषेजवळ लष्कर-ए- तोयबाच्या प्रशिक्षित दहशतवाद्याला लष्कराने अटक केली आहे

Updated: Aug 21, 2022, 11:33 PM IST
"मी मरायला आलो आहे"; आत्मघाती हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला अटक title=
(फोटो सौजन्य - ANI)

दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या (Indian Army) जवानांनी रविवारी एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशेरा सेक्टरमधील झांगढ येथे नियंत्रण रेषेच्याजवळ संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला, ज्यात घुसखोर जखमी झाला. घुसखोराला ताब्यात घेऊन उपचारासाठी वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले आहे.

त्यानंतर आता या घुसखोराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नियंत्रण रेषेजवळ लष्कर-ए- तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) प्रशिक्षित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याने पाकिस्तानी (Pakistan) लष्कराच्या गुप्तचर विभागासाठीही काम केले आहे अशीही माहिती समोर आली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील सब्जकोट गावातील रहिवासी 32 वर्षीय तबरिक हुसैन याला नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अटक करण्यात आली. त्यानुसार त्याला सहा वर्षांत दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, शेवटच्या वेळी तो आणि त्याचा भाऊ 26 महिने तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानला पाठवण्यात आले होते. आत्मघाती हल्ला करण्याची त्यांची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्याच्या म्हणण्यानुसार, लष्कराने त्याला जखमी अवस्थेत अटक केली तेव्हा तो, "मी मरायला आलो आहे, मला फसवण्यात आले आहे." भाईजान, मला इथून बाहेर काढा," असे ओरडत होता.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्मघाती मोहिमेवर असताना दहशतवादी जे करतात त्यानुसार त्याचे खाजगी जागेवरील आणि बगलेतील केस साफ करण्यात आले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१६ मध्ये हुसैन आणि त्याच्या १५ वर्षांच्या भावाला कालदेव-सबजकोट येथून मोहम्मद काफिल, मोहम्मद अली आणि यासीन या तीन दहशतवाद्यांकडे हद्दपार करण्यात आले होते. पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांचा साठा होता आणि त्यांनी भारतीय लष्कराच्या पुढील चौकीजवळ स्फोटके पेरण्याची योजना आखली होती.