Lipstick Effect: रशिया - युक्रेन युद्धामुळे महागाई आणि मंदीचा फटाकाही अनेक देशांना पडला आहे. त्यात तेलांच्या किमतीही यामुळे वाढल्या आहे. अर्थात मागणी किंवा पुरवठ्यात कुठलाही परिणाम झाला तरी त्याचा मोठा बदल हा अर्थव्यवस्थेवर होतो. अर्थतज्ञ हे अर्थव्यवस्थेची स्थिती समजून घेण्यासाठी डेटाची मदत घेतात. पण तुम्हाला माहितीये का की Lipstick ही आपल्याला अर्थव्यवस्थेची स्थिती सांगू शकते. तुम्हाला जाणून घ्यायची आहे कशी? चला तर मग समजून घेऊया काय आहे 'Lipstick Effect'?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते तेव्हा महिला महागड्या गोष्टींवरील खर्च कमी करतात. परंतु ते अशा गोष्टींवर खर्च वाढवतात ज्यामुळे त्यांच्या बजेटवर विपरीत परिणाम होत नाही. लिपस्टिक ही अशीच एक गोष्ट आहे. या संकल्पनेला अर्थशास्त्राच्या भाषेत 'Lipstick Effect' असे म्हणतात.
कशी झाली सुरूवात?
Lipstick Effect पहिल्यांदा दिसला तो 2001 मधील काळात. त्यावेळी असे दिसून आले की, अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असतानाही लिपस्टिकची विक्री वाढली. हे चित्र 1929 आणि 1993 च्या महामंदी दरम्यान देखील दिसून आले. त्याला 'लिपस्टिक इंडेक्स' असे नाव देण्यात आले. या सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेची स्थिती आणि सौंदर्यप्रसाधनांची विक्री यांच्यात संबंध जुळून आला. सध्या Lipstick Effect चा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काय आहे Lipstick आणि Underwear च्या विक्रीचा परिणाम?
'Lipstick Effect' अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा संदर्भ देते. होय, समजा एका देशात जिथे लोकं छोट्या सुविधा आणि लक्झरीवर खर्च करत असतील तर त्या देशात 'Lipstick Effect' चा परिणाम असतो. अशी परिस्थिती कधी कधी मंदीच्या काळातही पाहायला मिळते. Lipstick Effect जागतिक अर्थव्यवस्थेत अनेकवेळा दिसून आला आहे. अंडरवेयरची विक्रीही लिपस्टिकप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या स्थितीशी संबंधित आहे.