मोदी सरकारच्या या कामाचं वर्ल्ड बॅंकेनं केलं कौतुक

 भारताने विद्युतीकरण क्षेत्रात खूप चांगल काम केल्याचं आणि ८० टक्के लोकसंख्येपर्यंत वीज पोहोचल्याचे जागतिक बॅंकेन म्हटलयं.

Updated: May 5, 2018, 08:49 AM IST
मोदी सरकारच्या या कामाचं वर्ल्ड बॅंकेनं केलं कौतुक title=

वॉशिंग्टन : देशातील गावागावांमध्ये विज पोहोचविण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच कौतुक जागतिक बॅंकेनं केलयं. भारताने विद्युतीकरण क्षेत्रात खूप चांगल काम केल्याचं आणि ८० टक्के लोकसंख्येपर्यंत वीज पोहोचल्याचे जागतिक बॅंकेन म्हटलयं. जागतिक बॅंकेकडून या आठवड्यात जारी केलेल्या अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आलीयं. २०१० ते २०१६ दरम्यान मध्य भारताने ३ कोटी जनतेपर्यंत वीज पोहोचविली. जागतिक बॅंकेच्या मुख्य एनर्जी इकॉनॉमिस्ट विवियन फोस्ट यांनी भारत आता केवळ १५ टक्के जनतेपर्यंत वीज पोहोचविण्यापासून दूर असल्याचे सांगितले.

बांग्लादेश विद्युतीकरण वेगाने 

२०३० पर्यंत भारत देशभरात वीज पोहोचविण्यास यशस्वी होईल. बांगलादेश आणि केनियामधील वीज पोहोचविण्याचा वेग भारतापेक्षा अधिक असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.पंतप्रधानांनी एक आठवड्याआधीच सर्व गावात वीज पोहोचणार असल्याचे आश्वासन दिलं. या दरम्यानंच जागतिक बॅंकेचा हा अहवाल आलाय.

डिसेंबर २०१८ पर्यंत घर उजळणार 

गाव गाव वीजेने उजळल्यानंतर मोदी सरकार घरापर्यंत वीज पोहोचविण्याचं काम करते. यामध्ये सरकार लोकांच्या घरी येऊन वीज कनेक्शन देणार आहे. यासाठी गरीबांना सरकारी कार्यालयांत खेटे घालावे लागणार नाहीत. कोणत्याही गरीबाला यासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही. योजनेत नाव नसलेल्यांना ५०० रुपये भरून फायदा घेता येणार आहे. यासाठी सरकारला १६ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.