निवडणूक हरल्याने महिला उमेदवाराची आत्महत्या

पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. मात्र, या निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने एका उमेदवाराने चक्क आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 18, 2017, 11:45 PM IST
निवडणूक हरल्याने महिला उमेदवाराची आत्महत्या title=

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. मात्र, या निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने एका उमेदवाराने चक्क आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

आत्महत्या केलेल्या महिला उमेदवाराचं नाव सुप्रिया डे असं आहे. सुप्रिया यांनी कुपर्स कँप येथून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 

या पराभवानंतर सुप्रिया डे या खुपच तणावाखाली खोत्या. त्यानंतर त्यांनी ब्लड प्रेशर आणि डायबेटीजच्या गोळ्या एकत्र खाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

२००७ साली सुप्रिया काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेविका बनल्या. त्यानंतरही २०१३ साली त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही. 

पक्षाने तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र, निवडणुकांमध्ये त्यांचा अवघ्या ३० मतांनी पराभव झाला. तृणमुल काँग्रेसच्या अशोक सरकार यांनी त्यांचा पराभव केला. 

पराभव झाल्यानंतर सुप्रिया घरी आल्या आणि त्यानंतर त्यांनी ब्लड प्रेशर, डायबेटिज आणि झोपेचीही गोळी घेतली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचाराकरीता तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, त्यांचा मृत्यू झाला.