तुम्ही ITR भरला का? फायदे वाचून लगेचच Income Tax भरण्यासाठी धाव घ्याल

Income Tax Return : आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. तुमचे उत्त्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसले तरी ITR भरल्याचे अनेक फायदे आहेत.

Updated: Jul 25, 2022, 09:58 AM IST
तुम्ही ITR भरला का? फायदे वाचून लगेचच Income Tax भरण्यासाठी धाव घ्याल title=

मुंबई : Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. तुम्हाला शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 31 जुलैपूर्वी तुमचा ITR फाइल करणे गरजेचे आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. याशिवाय, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. .

ITR भरण्याचे फायदे जाणून घेऊया.

1. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ITR फायद्याचे
कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी तुमचे उत्पन्न पाहते. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे तुम्ही दाखल केलेला ITR. अशा प्रकारे तुमच्या उत्पन्नाचा अंदाज लावला जातो. अशा अनेक वित्तीय संस्था आहेत ज्या तुमच्या ITR मध्ये टाकलेल्या माहितीच्या आधारे कर्ज देतात. त्यामुळे तुम्हालाही कर्ज घ्यायचे असेल तर आयटीआर उपयुक्त ठरेल.

2. व्यवसाय वाढवण्यासाठी फायदेशीर
जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर ITR तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. सरकारी विभाग किंवा मोठ्या कंपन्या त्याच व्यावसायिकांकडून कोणतेही उत्पादन खरेदी करण्यास प्राधान्य देतात जे गेल्या तीन ते चार वर्षांपासून ITR भरत आहेत.

3. मालमत्तेत गुंतवणुकीची सुलभता
आयकर रिटर्न भरल्याने घर खरेदी आणि विक्री, बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा करणे आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करते. आयटीआर फाइल करणाऱ्यांनी म्युच्युअल फंडात मोठी रक्कम गुंतवली किंवा बँकेत मोठी रक्कम जमा केली, तर आयकर विभागाकडून नोटीस मिळण्याचा धोका नाही. याशिवाय मालमत्ता खरेदी केल्यानंतरही तुमची चौकशी केली जात नाही.

4. विमा संरक्षण मिळवणे सोपे
बँकेकडून कर्ज घेण्याव्यतिरिक्त, जर तुम्ही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मोठे विमा संरक्षण घेत असाल, तर ITR तुमच्यासाठी देखील फायदेशीर आहे. याचे कारण म्हणजे अनेक विमा कंपन्या ITR मागतात. तुमचा ITR जितका मोठा असेल तितके मोठे कव्हर तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. यावरून तुमच्या उत्पन्नाच्या नियमिततेचा अंदाज येतो.