Income Tax Return भरण्याची तारीख वाढवली.... आणखी कोणत्या तारखा वाढवल्या? जाणून घ्या

इनकम टॅक्स संबंधित कोणकोणत्या तारीखा वाढवण्यात आल्या आहेत ते पाहा

Updated: May 20, 2021, 08:53 PM IST
Income Tax Return भरण्याची तारीख वाढवली.... आणखी कोणत्या तारखा वाढवल्या? जाणून घ्या title=

मुंबई : करदात्यांना सरकारकडून एक चांगली बातमी देण्यात आली आहे.  करदात्यांना इनकम ट़ॅक्स (Income Tax Return) भरण्याची शेवटची तारीख आता वाढवण्यात आली आहे.  इनकम ट़ॅक्स भरण्याची शेवटची तारीख आधी 31 जुलै 2021होती, परंतु ती आता वाढवण्यात आली आहे. आता सामान्य करदाता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत इनकम ट़ॅक्स रिटर्न भरण्यास सक्षम असणार. कोरोना संसर्गाच्या वाढत्या संक्रमणामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. कर तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे कंपन्या आणि सामान्य करदात्यांशी संबंधित अनेक करांच्या तारखांची मुदत वाढवण्यात आली आहे.

इनकम टॅक्स संबंधित कोणकोणत्या तारीखा वाढवण्यात आल्या आहेत ते पाहा (Income Tax Return Filing AY 2021-22 Last Date Extended).

(1) आर्थिक वर्ष 2021-22 साठी टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 होती, ती आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

(2) इनकम टॅक्स ऑडिटची (Income for Tax Audit Assesses) अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 होती, ती आता 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर इनकम टॅक्स ऑडिट फायनल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती, ती आता 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे.

(3) बिलेटेड / रिवाइज्ड इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती, ती 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्षासाठी इनकम टॅक्‍स रिटर्न (आईटीआर) भरण्यासाठीची मूळ मुदत संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न भरले जाते. यासाठी करदात्याला दंड भरावा लागतो. करदात्याचा मूळ इनकम टॅक्‍स भरताना काही त्रुटी आल्या असतील, तर रिवाइज इनकम टॅक्स रिटर्न भरले जाते.

बायलटेड आयटीआर आयकर कायदा 1961 च्या कलम 139 (4) च्या अंतर्गत दाखल आहे. त्याचबरोबर सुधारित आयटीआर कलम 139 (5) अंतर्गत देखील दाखल केला जातो

(4) फॉर्म 16 देण्याची शेवटची तारीख 1 जून 2021 वाढवून 1 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. फॉर्म 16 इनकम टॅक्स भरण्यास मदत करतो. तसेच हा उत्पन्नाचा पुरावा म्हणून वापरला जातो.