या असल्या बाईला आई म्हणायचं? iPhone खरेदी करण्यासाठी 8 महिन्याच्या लेकराला विकलं

आठ महिन्याच्या बाळाला विकणाऱ्या आईला रील्स बनवण्याचे व्यसन जडले होते. याकरिता आयफोन खरेदी करण्यासाठी बाळाला विकल्याची कबूली या महिलेने पोलिसांना दिली आहे. 

Updated: Jul 25, 2023, 02:25 PM IST
या असल्या बाईला आई म्हणायचं? iPhone खरेदी करण्यासाठी 8 महिन्याच्या लेकराला विकलं title=

Crime News : आयफोन खरेदी करण्यासाठी किडनी विकल्याचे मिम्स आणि गमतीशीर व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असतात. तर, आयफोन करण्याच्या चित्र विचित्र मार्ग निवडल्याचे प्रकार देखील घडत असतात.  iPhone खरेदी करण्यासाठी एका आईने आपल्या 8 महिन्याच्या लेकराला विकलं आहे.  पश्चिम बंगालमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलाचा सौदा करणाऱ्या निर्दयी मातेला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. 

नेमकं काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगाल येथील के उत्तर 24 परगना येथील हे प्रकरण आहे. आरोपी महिलेला सात वर्षाची आणखी एक मुलगी आहे. आरोपी महिलेने मुल विकल्याचे तिच्या पतीला देखील माहित होते. आरोपी महिलेला Instagram Reels बनवण्याचे व्यसन जडले होते. चांगले  Reels बनवता यावे यासाठी तिला  iPhone खरेदी करायचा होता. मात्र, मोल मजुरी करणाऱ्या या जोडप्याकडे तितके पैसे नसल्यामुळे त्यांनी आट महिन्याचे बाळ विकले. 

महागडा मोबाईल पाहून संशय आला

अचानक ही महिला महागडा  iPhone मोबाईल घेऊन फिरु लागली. तिने अनेक ठिकाणी जाऊन Reels देकील बनवले आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले. सोशल  मिडियावर व्हिडिओ पाहून आणि हातात  महागडा मोबाईल पाहून शेजाऱ्यांना संशय आला. महागडा मोबाईल  खरेदी करण्यासाठी यांच्याकडे ऐवढे पैसे कुठून आले असा प्रश्न शेजाऱ्यांना पडला. तसेच तिचे आठ महिन्याचे बाळ देखील दिसत नव्हते. दरम्यान या महिलेचे पोलिसांसह भांडण झाले. हा वाद पोलिस ठाण्यात पोहचला. यावेळी  शेजाऱ्यांनी महिलेचे बाळ गायब असल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असताया महिलेचे बिंग फुटले.

8 महिन्याचे बाळ विकल्यानंतर सात वर्षाच्या मुलीला देखील विकणार होते

8 महिन्याचे बाळ विकल्यानंतर सात वर्षाच्या मुलीला देखील हे निर्दयी पती पत्नी विकणार होते अशा धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी विकलेल्या बाळाला शोधून काढले. पश्चिम बंगालमधीलच एका महिलेला हे बाळ विकण्यात आले होते. हे बाळ कितीला विकले याबाबत पोलिस अधित तपास करत आहेत. आरोपी पत्नी पत्नीने मोबाईल खरेदी करण्यासाठी बाळ विकल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.