मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर आपल्याला असे अनेक कन्टेंट पाहायला मिळतात, जे पाहाण्यापासून तुम्ही स्वत:ला थांबवू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्ही पोट धरुन तर हसालच. शिवाय तुम्हाला यासाठी शब्द सुचणार नाही. पण खरोखरंच माणसाने विचार केला, तर तो काहीही करु शकतो हे या व्हिडीओने सगळ्यांना दाखवून दिलं आहे. सोशल मीडियावरील व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. जेथे लोकं त्यांच्या बुद्धीचा अती वापर करताना पाहायला मिळत आहे.
तुम्हाला तर माहितच आहे की, लग्नात वेगवेगळ्या गोष्टींचे डेकोरेश असते. यासाठी काही लोक पताके, लाईट, कारंज्या लावतात. ज्यामुळे लग्नात एक माहौल तयार होतो, ज्यामुळे सगळं सुंदर आणि ऑर्गनाईझ दिसेल. परंतु यासगळ्याचा लग्नात आलेल्या लोकांनी फज्जा उडवला आहे.
हा व्हिडीओ कधीचा किंवा कोणत्या भागातील आहे हे काही कळलेलं नाही. परंतु या लग्नात पाहूण्यांनी जे केलंय त्याला काही तोड नाही.
या व्हिडीत तुम्हाला मंडप सजलेलं दिसेल, ज्यात तुम्हाला कारंज्यांजवळ लोकांची गर्दी दिसेल. तुम्हालाही हा प्रश्न पडेल की, लोकं नक्की तिथे काय करतायत? परंतु तुम्ही नीट पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की, या कारंज्याजवळ लोकं आपले हात धूत आहेत. हा व्हिडीओ फोरच मनोरंजक दिसत आहे. व्हिडीओतील लोकांचं हे वागणं सगळ्यांसाठीच पोट धरुन हसवणारं आहे.
फक्त 26 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ 4 मार्चला सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता, ज्याला अगदी काही दिवसात लोखो व्हुव्ज मिळाले आहेत.